ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड,पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाची कामगीरी….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस स्टेशन आर्वी डी बी पथकाने २४ तासाचे आत ईरीगेशन वायर चोरीचा गुन्हा केला उघड…..

आर्वी(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 03 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीचे मॅनेजर ने पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की दि 01 मार्च रोजी मौजा धनोडी बहादरपुर शिवारातील जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीमध्ये लागणारे लँट्रल पाईपचे 12 बंडल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. अशा मॅनेजरचे तक्रारीवरुन दि 03 मार्च रोजी अप क्र 173/2025 कलम 303 (2) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता





त्याअनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास सुरु  असतांना गोपनीय बातमीदारा कडुन माहीती मिळाली की सदरची चोरी सुहर्ष विनायकराव महाकुलकर याने केल्याचे कळताच त्यास सदर गुन्ह्यात निष्पन्न करुन सुहर्ष विनायकराव महाकुलकर वय 30 वर्ष रा. खानगाव पोष्ट बोथली ता. चिमुर जि. चंद्रपुर ह.मु. C/O शेख कयुम, धनोडी बहादरपुर ता. आर्वी जि. वर्धा याला ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन सखोल विचारपुस केली असता गुन्ह्याची कबुली दिली



सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला जैन ईरीगेशन सिस्टम लिमीटेड कंपनीचे प्रकल्पामध्ये ठिबक सिचंनासाठी लागणारे लँट्रल काळ्या रंगाचे पाईपचे एकुन 12 बंडल प्रति बंडल 5000/- रुपये प्रमाणे एकुन 60,000/- रुपयाचा संपुर्ण मुद्देमाल सुहर्ष विनायकराव महाकुलकर वय 30 वर्ष रा. खानगाव पोष्ट बोथली ता. चिमुर जि. चंद्रपुर ह.मु. C/O शेख कयुम, धनोडी बहादरपुर ता. आर्वी जि. वर्धा याचे ताब्यातुन पुराव्याकामी पंचासमक्ष जप्त केला.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागिय पोलिस अधिकारी आर्वी देवराव खंडेराव यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन आर्वी ठाणेदार पो.नि. सतिश डेहनकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप.नि. सर्वेश बेलसरे, परि.पो.उप.नि. गितांजली गारगोटे, पोलिस अमंलदार योगेश चन्ने, अंकुश निचत, अमोल गोरटे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सुरु आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!