सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाची देवळी पोलिस स्टेशन हद्दीत रेती माफीयांवर मोठी कार्यवाही,५५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सहा.पोलिस अधिक्षक पुलगाव यांचे पथकाची देवळी पोलिस स्टेशन हद्दीत खेर्डा घाटावर रेती माफियांवर मोठी कार्यवाही, लाखोंचा मुद्देमाल जप्त…

देवळी(वर्धा)प्रतिनिधी) – या बाबत सविस्तर वृत्त असे की, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण यांनी त्यांचे पथकास आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने सदर पथक हे देवळी पोलिस स्टेशन हद्दीत गस्तीस असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजा खर्डा येथील वर्धा नदीचे पात्रात छापा टाकून रेती माफियांवर कारवाई केली सदर घटनास्थळावरुन 1) टिप्पर क्र एम.एच 29 बी 8604, कि, 14,00,000/-, 2) एक लाल रंगाचा नंबर नसलेला महींद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कि. 9,00,000/-, 3) ट्रॅक्टर क्र एम एच ३४ बी.जी. 1047, कि 7,00,000/-, 4)एक लाल रंगाचा नंबर नसलेला महींद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कि, 9,00,000/-, 5) एक निळ्या रंगाचा नंबर नसलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉली सह कि 9,00,000/-, 6) सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच 32 टिसी 399, कि 7,00,000/-, 7) एकुण 03 ब्रास रेती कि 15000/- रू असा एकुन कि. 55,15,000/- रुपयाचा मुद्देमाल महसुल विभागा मार्फत पंचासमक्ष जप्त करण्यात आला.





सदर घटनास्थळावरुन रेती माफीयांवर कारवाई करून टिप्पर, ट्रॅक्टर, ट्रॉली, रेती असा एकूण 55 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात महसूल अधिकारी अक्षय सुनिल लोणकर, (वय 30 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 910/2024, कलम 303(2),3(5),भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 3(1),181,130/177 मोवाका अंतर्गत देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे



सदर घटनास्थळावरुन वर नमुद मुद्देमालासह 1) अनिकेत वसंतराव निखाडे, (वय 26 वर्ष), रा.इसापुर, ता.देवळी जि. वर्धा,2) कुणाल राजु कुडमते, (वय 22 वर्ष, रा.आंजी, ता.देवळी, जि.वर्धा, 3) अक्षय विजय भांबेवार, वय 25 वर्ष, रा.आंजी, ता.देवळी, जि.वर्धा, 4) अनिल ज्ञानेश्वर गाडगे, वय 35 वर्ष, रा.अंदोरी, ता.देवळी, जि.वर्धा, 5) प्रभाकर विष्वेश्वर नेवारे, (वय 42 वर्ष), रा.अंदोरी, ता.देवळी, जि.वर्धा,’6) तनय शंकरराव ढोणे, (वय 23 वर्ष), रा.अंदोरी, ता. देवळी, जि.वर्धा, या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे.तसेच यातील 7) रवि पारीसे रा. अंदोरी, ता. देवळी, जि. वर्धा हा घटनास्थळावरुन पसार झाला त्याचा शोध सुरु आहे



सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण,पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे,ठाणेदार पोलिस स्टेशन देवळी, सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकातील पोउपनि प्रेमराज अवचट,सफौ. सुभाष गावड, पो.शि. उमेश बेले,रामदास दराडे, पोलिस स्टेशन देवळी येथील पोलिस अंमलदार किशोर साखरे,संदीप वाघमारे,विनोद कांबळे, मनोज नप्ते, कैलास पेटकर, यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!