कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनांवरांना तळेगाव पोलिसांनी दिले जिवनदान…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या निर्दयतेने व क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे तळेगाव शा.पंत पोलिसांचे ताब्यात…

तळेगाव(शा.पंत)वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१६) रोजी संध्याकाळी ५.०० वा चे सुमारास पोलिस स्टेशन तळेगाव येथील ठाणेदार सपोनि संदीप ढोबे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की एका झायलो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करीत आहे





अशा मिळालेल्या माहीतीवरुन आष्टी टी पॅाईंटवर नाकाबंदी केली असता मिळालेल्या माहीतीनुसार झायलो कंपनीचे MH05BJ0612 या क्रमांकाचे वाहन येतांना दिसताच त्यास थांबवुन त्याची तपासनी केली असता त्यात ६ नग गाई व २ कालवड असे  गोवंश जनावर निर्दयतेने कोंबुन त्यांचे चारापाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करतांना आढळुन आले त्यातील ईसम १) शेख रेहान शेख हयात कुरेशी, वय २० वर्ष २)शेख एजाज शेख हयात कुरेशी वय २३ वर्ष दोन्ही रा अन्सार नगर अमरावती यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातुन एक वाहन किंमत ५०००००/- रु २)६ गोवंशीय जनावर कि ७४०००/-रु ३) दोन मोबाईल किंमत २००००/- असा एकुन ५९४०००/- रु चा मुदेमाल ताब्यात घेऊन सदर तिन्ही आरोपीविरुध्द कलम ११(१)(घ)(ड) (च) प्रा. नि. वा. प्रति अधिनियम १९६० सहकलम ५(अ), ९ म. प्रा. संरक्षन अधि. १९९५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,आर्वी देवराव खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन तळेगाव सपोनि संदीप ढोबे,पोउपनि श्याम सोनपरोते,पोशि राहुल अमुने,बालाजी म्हस्के, रोशन करलुके, नितेश वाघमारे यांनी केली



 

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!