बनावट फोन कॅाल करुन डीजीटल अरेस्टची भिती दाखविणार्यास वर्धा सायबर पोलिसांनी गुजरात येथुन घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बनावट फोन कॅाल करुन डीजीटल अरेस्टची धमकी देऊन,रक्कम उकळणार्या आरोपीस गुजरात येथुन घेतले ताब्यात,सायबर पोलिसांची कामगिरी…..

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सायबर पो.स्टे. वर्धा येथे दि. १८.०९.२०२५ रोजी हिंगणघाट येथील फिर्यादी यांनी प्रत्यक्ष येवुन लेखी तक्रार दिली की, त्यांचे मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्याने फिर्यादी यांना सायबर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडीया येथुन बोलत असल्याचे सांगुन फिर्यादी यांचे नावे अंधेरी मुंबई येथे सिम खरेदी करण्यात आले व  त्याव्दारे फिर्यादीचे नावे कॅनरा बँकेत खाते उघडुन २ कोटी रूपये दहशतवादी संघटनेला ट्रांन्सफर करण्यात आले. तसेच फिर्यादीचे मोबाईल वरून २० लोकांना फसवणुकीचे संदेश गेले आहे असे सांगितले.







त्यानंतर व्हिडीओ कॉलव्दारे पोलिस गणवेशातील बनावट अधिकाऱ्याने फिर्यादीशी बोलणी करून फिर्यादी यांना केंद्रीय गुप्तचर संस्था तसेच ईतर केंद्रीय तपासी यंत्रणा यांचे संयुक्त तपास पथके असुन फिर्यादी यांची चौकशी चालु आहे. अशी भिती दाखवुन
त्यांना डिजीटल अरेस्ट करून फिर्यादी व त्यांचे कुटूंबियांना अटकेची भिती दाखवुन त्यांचे कडुन ४,५०,०००/- रू आरोपीने दिलेल्या खात्यावर ट्रांन्सफर करण्याचे सांगितले. यावरून फिर्यादी यांनी भितीपोटी सदर रक्कम त्यांचे खात्यावर ट्रांन्सफर केली. त्यानंतरही परत अधिक रकमेची मागणी केली असता फिर्यादी यांना लक्षात आले की, नमुद आरोपीनी संगणमत करून अटकेची भिती दाखवुन यांना डिजीटल अरेस्ट करून फसवणुक केली. यावरून फिर्यादी
हे सायबर पो.स्टे. वर्धा येथे येवुन संबंधीत अज्ञात आरोपी विरूध्द तक्रार दिली असता अपराध क १३ / २५ कलम३१८(४), ३१९(२) भारतीय न्याय संहिता सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.होता
सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषणावरून गुन्हयातील फिर्यादीची रक्कम सैयद अशफाक सैयद अलीम,रा. ‘अमरोली, सुरत (गुजरात) याघे इंडसईंड बँक खात्यात वळती झाल्याचे गुन्हयाचे तपासात निष्पन्न झाले.त्यावरून आरोपी सैयद अशफाक सैयद अलीम, वय ३६ वर्षे, रा. अमरोली, सुरत (गुजरात) यास दि. २७.०९.२०२५ रोजी सुरत (गुजरात) येथुन गुन्हयात अटक करण्यात आली. तसेच आरोपीचा दि. २९.०९.२०२५ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करण्यात येवुन गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. गुन्हयातील आरोपीच्या संख्येत वाढ होवुन ईतर आरोपी यांना निष्पन्न करून अटक करने बाकी आहे.



सदरची कार्यवाही. पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर,पो.हवा अनुप राऊत, ओमप्रकाश कोकोडे, निलेश तेलरांधे, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, रणजित जाधव, अनुप कावळे, पो.शि.संघसेन कांबळे, पवन झाडे, प्रतिक वांदीले, म.पो. शि/लेखा राठोड, व आरती पारीसे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!