
वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,१६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
स्थानीक गुन्हे शाखेने संशईतांना ताब्यात घेऊन वर्धा शहर हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,16,90,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त…
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,होमेश ठमेकर रा.रामनगर यांनी दिनांक १७ ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा सहकारी मित्र विपीन मानकर रा पुलफैल हे दिनांक १६ ॲाक्टोबर २०२४ रोजी नागपुर येथे काही कामानिमित्य गेले होते रात्री उशीरा ते मद्यप्राशन करुन वर्धा येथे परत आले असता होमेश ठमेकर यास त्यांचे घराजवळ रामनगर परीसरात सोडले ते गाडीतच झोपले असतांना कुणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे गळ्यातील सोन्याची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकाऊन पळुन गेले अशा फिर्यादी होमेश याचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 1655/2024 कलम 304(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे अज्ञात आरोपीचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाऱ्खेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना गोपनीय माहीती तसेच तांत्रीक विश्लेशनाच्या आधारे यातील संशईत ईसम अमित अरुण नाकाडे, वय 22 वर्ष, रा. सुदर्शन वार्ड क्र. 26 पूलफैल वर्धा यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सांगीतले की दि १६ रोजी यातील फिर्यादी होमेश ठमेकर व त्याचा मित्र विपीन मानकर हे दोघे नागपुरवरुन परत येऊन ठमेकर याचे घराजवळ गाडीच झोपले असतांना विपीन मानकर यांने यातील आरोपी अमित नाकाडे यास फोन करुन बोलावले

यावरुन अमित नाकाडे हा ठमेकर याचे घराजवळ आल्यावर यातील फरार विपीन मानकर यांने फिर्यादी हा नशेमधे आहे आणि त्याचे अंगावर किंमती दागीणे आहे करीता तु पटकन जावुन यातील आरोपी क्र ३) पिंटू किसन मानकर, वय 21 वर्ष, रा. सुदर्शन वार्ड क्र. 25 पूलफैल वर्धा,यास घेऊन ये असे विपीन याचे सांगण्यावरुन अमित नाकाडे ह्याने ठमेकर यांची गाडी चालवीत जी एस कॅामर्स कॅालेजजवळ घेऊन गेले तिथे यांतील तिन्ही आरोपींनी नशेत असलेल्या ठमेकर यांचे गळ्यातील सोनसाखळी अलगद काढुन घेतली तसेच त्याचे हातातील ब्रेसलेट काढत असतांना ठमेकर यांना जाग आली म्हनुन सर्व आरोपी गाडी व ठमेकर यांना सोडुन तिथुन पळुन गेले

यातील चोरीचा मास्टरमाईंड आरोपी क्र १) विपिन मानकर,पूलफैल वर्धा याचे सांगणेवरून यातील आरोपी क्र २) अमित नाकाडे व आरोपी क्र ३) पिंट्या मानकर याचे सहकार्याने फिर्यादीचे गळ्यातील 215 ग्राम वजनाची सोन्याची सोनसाखळी लॉकेटसह हिसकावून चोरून नेली अशी कबुली ताब्यात असलेल्या आरोपी अमित नाकाडे याने दिल्याने यातील आरोपी क्र 2) पिंट्या मानकर यास शिताफिने ताब्यात घेऊन यातील मुख्य आरोपी विपीन मानकर हा फरार असुन त्याचा शोध सुरु आहे
तसेच सदर गुन्हयातील हिसकावून चोरी केलेले सोन्याची सोनसाखळी 200 ग्रॅम वजनाची तसेच गुन्हा करणे करीता वापरलेली एकुण 01 वाहन व 02 मोबाईल असा एकुण किंमत 16,90,000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हे करीत आहे.
सदरची कमगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस अधिक्षक विनोद चौधरी, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, गजानन लामसे, महादेव सानप, मनिष कांबळे, रितेश शर्मा, अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दिपक साठे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.


