
गिरड पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारीवर कार्यवाही ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल हस्तगत….
गिरड पोलिसांचा जुगार अडड्यावर छापा,१५ जुगारींसह ७.५० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत….
गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे ज्यीत दारुविक्री,जुगार,सट्टा,गांजा यांवर कडक कार्यवाही करुन ते बंद करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने गिरड पोलिसांचे पथक पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पथकास मिळालेल्या माहितीनुसार खेक शिवार परिसरात वन विभागाच्या नर्सरीच्या जागेवर सुरु असल्याबाबत माहीती मिळताच दि.०७/०६/२०२५ चे ४.० वा ते ६.१० दरम्यान त्या ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी काही ईसम तासपत्तीवर जुगार खेळतांना आढळुन आले


त्यामध्ये आरोपी १) विठ्ठल मारुती सुपारे रा. खेक, ता.समुद्रपूर. जी.वर्धा २) अनिकेत गंगाधर दडमल रा. खेक, ता. समुद्रपूर, जी. वर्धा ३) सचिन ब्रह्मा लोखंडे. रा. कोरा ता. समुद्रपूर, जि वर्धा.४) शांताराम नामदेव गजभे.रा. येरखेडा, ता. वरोरा, जी. चंद्रपूर ५) दामोदर बापूराव दिवे. रा. खापरी, ता. समुद्रपूर, जी. वर्धा ६) सुखदेव श्रीराम अवचट. रा. रा. खेक, ता. समुद्रपूर, जी. वर्धा ७) सुरेश शंकर गुळघाणे रा. कोसरसार, ता. वरोरा, जी. चंद्रपूर ८) सुभाष आत्माराम तडस. रा. डोंगरगाव, ता. समुद्रपूर. जी. वर्धा. ९) दादाराव नावाचा इसम (पसार) रा. चिकणी. ता.वरोरा.जी चंद्रपूर.१०) राजू कन्नाके (पसार) रा. येरखेडा. ता. वरोरा. जि. चंद्रपूर ११) दुर्योधन भोयर (पसार) रा. साखरा. ता. समुद्रपूर. जि. वर्धा.१२) जग्गू अकाली (पसार)रा. कोरा. ता. समुद्रपूर. जी. वर्धा.१३) विठ्ठल ननावरे (पसार) रा.खेक.ता. समुद्रपूर. जी.वर्धा.१४) किशोर सोनवणे (पसार) रा. नारायणपूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा. असे मिळुन आले त्यांचे ताब्यातुन एकूण ७,५६,७५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेत नमुग १५ आरोपी यांचे विरुध्द पोलिस स्टेशन गिरड येथे अप क्र १५९/२०२५ कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

तसेच १) आरोपी क्र १ ते ८ यांचे अंगझडतीतून व जुगार वरील डावावरचे एकूण नगदी ६४३००/रु. २) ८ मोबाईल संच एकूण किंमत १९२०००/रु ३) ९ मोटर सायकल ज्यांची एकूण किंमत ५०००००/रु च्या. ४) जुगार खेळण्याचे ५२ तास पत्ती चे ९ पॅकेट एकूण किंमत ४५०/रु. असा एकूण किंमत ७५६७५०/रु चा मुद्देमाल. जप्त करण्यात आला
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाच रोशन पंडित यांचे मार्गदर्शनाखाली ठानेदार पोलिस स्टेशन गिरड सपोनी विकास गायकवाड यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत पोउपनि गोमेद पाटील,सफौ परमेश्वर झांबरे, पो हवा सचिन ठाकरे,नापोशी प्रफुल्ल हेडाऊ, अमर धोटे,नितेश नागोसे,
पोशि प्रेमदेव सराटे, मनोज पानचोरे, गणेश मते, गणेश इंगळे,सैनिक पलटण नायक राजेश लाजुरकर व ८ सैनिक यांनी केली



