हिगणघाट डी बी पथकाने पकडली शहरात विक्रीकरीता येणारी मोहादारुची खेप….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि.(११)ॲागस्ट रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशन  ला हजर असताना मुखबिर कडुन खात्रीशीर गोपनीय माहीती  मिळाली की, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा व मोहादारुचा व्यवसाय करणारा प्रविण तल्लार हा त्याचे  वाहन क्रमांक MH 32 AA 4756 वाहनाने अवैधरित्या गावठी मोहा दारू विक्री करण्याचे उद्देशाने  वना नदी चे पुला वरून नांदगाव चौक हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे,

अशा खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने. यांना देवून त्यांचे आदेशाने नांदगाव चौक हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे मोपेड वाहन क्रमांक MH 32 AA 4756 गाडी डिक्कीत गावठी मोहा दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने त्यास पोस्टाफचे मदतीने नाकाबंदी करून थांबविण्याचा इशारा केला चालकाने त्याचे ताब्यातील वाहन थांबवले असता सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले.त्याने त्याचे नाव गाव प्रविण राजाभाऊ तल्लार वय 41 वर्ष रा. इंदिरा गांधी वॉर्ड हिगणघाट सांगितले.सदर मोपेड वाहनांची पाहणी केली असता मोपेड गाडीचे पायदान मध्ये ठेवून असलेल्या चुगडी मध्ये चार मोठ्या प्ल्यास्टिक पन्नीमध्ये 20 लिटर प्रमाणे एकूण 80 लिटर गावठी मोहा दारू प्रती लिटर 150 रु. प्रमाणे 12,000 रु. जुनी  हिरो कंपनीची मेस्ट्रो पांढऱ्या रंगाची मोपेड वाहन जिचा नोंदणी क्र MH 32 AA 4756 किंमत 70,000 रु. असा एकून 82,000 रू चा मुद्देमाल विनापरवाणा वाहतूक करतांना मिळुन आल्याने  जप्ती पंचनामा प्रमाणे सदर माल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.





सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक नूरूल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज गभणे पोलिस स्टेशन. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील पोउपनि. भारत वर्मा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, पोशि आशिष नेवारे, विजय काळे,. अमोल तिजारे यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!