आंतराज्यीय मोबाईल चोरी करणारी टोळी हिंगणघाट पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

आंतराज्यिय मोबाईल चोरणारी टोळी हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१८)जुन रोजी यातील तक्रारदार  प्रदीप हिरानंद दुबानी वय 31 वर्ष रा. यशवंतनगर हिंगणघाट यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार  दिली की ते दि(१८)रोजी त्यांचे आईला सोडण्याकरीता बसस्थानक हिंगणघाट येथे गेले असता व त्याचे आईला बस मधे बसवुन देण्याकरीता बसमधे चढले व बसच्या खाली उतरले असता फिर्यादीस त्यांचे खिशातील विवो कंपनीचा एक्स 70 प्रो मोबाईल फोन, Aurora Dawn कलरचा मोबाईल खिशात दिसला नाही. फिर्यादीचे खिशात असलेला मोबाईल बस मधे चढताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला.अशा त्यांचे तक्रारीवरुन अनोळखी आरोपी विरूध्द चोरीची गुन्हा नोंद केला होता





सदर गुन्हयांतील अनोळखी आरोपीची शोध घेण्याकरीता पोलिस निरीक्षक  प्रविन मुंडे, पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे,नापोशि राहुल साठे,पो.शि विजय काळे, शिवशंकर यादव,अमोल तिजारे ,आशिष नेवारे ,हे त्याचे पथका सह सायबर शाखा वर्धा येथील पोहवा अनुप कावळे,निलेश कटटोजवार यांचे मदतीने जिल्हा वर्धा व नागपुर येथे रवाना होवून लोकमान्य मेट्रो स्टेशन, हिंगणा नागपुर येथून आरोपी  1) शेख रियाज शेख मुजाहिद वय 23 वर्ष रा. महाराजपुर,डाक बंगला, मोतीझरना ता. तेलझाडी जि.साहेब गंजराज्य झारखंड 2) शेख टिंकु शेख उमर वय 19 वर्ष रा. डाकबंगला, मोतीझरना पोस्ट महाराजपुर ता. तेलझाडी जि.साहेब गंज राज्य झारखंड 3) शेख मुज्जफर शेख नईम वय 19 वर्ष रा. कल्यानी मोजा, पोस्टे महाराजपुर ता.तेलझाडी जि. साहेबगंज राज्य झारखंड यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडुन कसुन तपास केला असता गुन्हयातील चोरीस गेलेला व्हिवो 70 प्रो कंपनीचा मोबाईल कि.५१८००/-रूं व आरोपी जवळील 03 मोबाईल कि. २८३००/- रू असा एकुन ८०.१००/- रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.



सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट पोलिस निरीक्षक प्रविन मुंडे यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा प्रशांत ठोंबरे,नापोशि राहुल साठे,पोशि शिवशंकर यादव ,आशिष नेवारे,अमोल तिजारे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!