
अवैधरित्या मोहा दारु गाळणार्यांवर हिंगणघाट डि बी पथकाची कार्यवाही..
विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने हिंगणघाट डि बी पथकाची खैराटी पारधी बेड्यावर गावठी मोहा दारु विक्रेत्यावर मोठा छापा……
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुक २०२४ व दिवाळी उत्सव संबंधाने दिनांक 31/10/2024 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की,सुनील भोसले रा. खैराटी पारधी बेडा हा खैराठी पारधीबेडा येथील नाल्याजवळ अवैधरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोहन रसायन सडवा गाळीत आहे


अशी खात्रीशीर माहिती ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा खैराटी येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे खैराटी पारधीबेडा येथे छापा केला असता त्याठिकानावरुन 1) 09 लोखंडी ड्रममध्ये 1350 लिटर मोहा रसायन सडवा कीं. 67,000/- रू 2) 03 मोठे प्लास्टिक ड्रम मधे 450 लिटर मोहन रसायन सडवा कीं 22500/-,रू 3)09 छोटे प्लास्टिक ड्रममध्ये 900 लिटर मोहन रसायन सडवा कीं 45,000/- रू 4) ड्रमसाहित्य कीं.10,900/- रू असा एकूण 1,44,900/- रू चा मुद्देमाल मिळुन आला सदरचा मुद्मेमाल जप्ती पंचनामा प्रमाने कार्यवाही करून कच्चा मोहा रसायन सडवा व साहित्य नाश करून करून आरोपी सुनील भोसले रा खैराटी बेढा याचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतन कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाच रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार ठाणेदार पोलिस निरीक्षक मनोज गभने, पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पो.उपनि भारत वर्मा डि.बी. पथकाचे पोहवा प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे,पोशि मंगेश वाघमारे, आशिष नेवारे विजय काळे यांनी केली



