हिंगणघाट डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडली शहरात अवैधरित्या विक्रीकरीता येणारी देशी दारुची खेप….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

हिंगणघाट डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडला शहरात अवैध विक्रीकरीता येणारा दारुचा साठा,आरोपी ताब्यात….

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२६)सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वा चे दरम्यान पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी  पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशनला हजर असता, मूखबीर कडून खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाली की, कुणाल धोटे नावाचा इसम त्याचे ताब्यातील चारचाकी वाहनाने जाम रोडने हिंगणघाट कडे दारुचा माल घेऊन वाहतूक करीत आहे.





अशा खात्रीशीर माहीती पोलिस निरीक्षक  मनोज गभने ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांना देवून त्याचे मार्गदर्शनात पंच व पथकासह नाकेबंदी करीत असताना मिळालेल्या माहितीप्रमाणे चारचाकी वाहन येताना दिसल्याने पो.स्टाफचे मदतीने नाकेबंदी करून सदर वाहनास थांबवून चालक कुणाल विनोद राव धोटे वय 24 वर्ष राहणार नंदोरी हिंगणघाट यांचे ताब्यातून 1) 4 खरड्याच्या खोक्यात प्रीमियम नंबर वन कोकण देशी दारूचा 400 बाटल्या किंमत 40,000रू, 2) Hundai कंपनीची i-20 गाडी क्र MH04 dy 1335 कीं 1,50,000रू असा एकूण किंमत 1,90,000रू मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पोस्टे हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 1308/2024 कलम 65(अ )(ई ), 77(अ ) दारूबंदी कायदा सहकलम 3(1),181,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली ठानेदार पोलिस स्टेशन,हिंगणघाट पोलिस निरीक्षक मनोज गभने यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोउपनि भारत वर्मा, पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!