गुटख्याची तस्करी करतांना एकास वाहनासह हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट पोलिसांचे डि बी पथकाने नाकाबंदी करुन पकडला १.७५ लाखाचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असा सुगंधी तंबाखु/गुटखा…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेशानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे  अंमलदार दिनांक 08 रोजी गणपती विर्सजन रॅली संबंधाने पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना, गोपनीय माहीती मिळाली की मौजा बोरगांव ( नांदगांव) येथे एक इसम त्याचे  मारूती सुझूकी व्हॅगनर गाडीने सुंगधीत तंबाखुची वाहतूक करून घेवून येत आहे,







अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहीती ठाणेदार पोलिस निरीक्षक  देवेद्र ठाकूर यांना देवून त्याचे आदेशाने मौजा बोरगांव ( नांदगांव) येथे पोस्टाँप सह रवाना होवून पोस्टाँपचे मदतीने सापळा रचून नाकेबंदी करून वाहन क्र.एम.एच.- 31 सीएन 6617 येतांना दिसताच सदर वाहनास थांबवून वाहनांची पाहणी केली असता वाहनामध्ये प्रतीबंधीत सुंगधित तंबाखूचा साठा मिळून आला



सदर वाहन ताब्यात घेवून पोलिस स्टेशनला आणुन  अन्न सुरक्षा अधिकारी वर्धा यांना पत्रव्यवहार करून रविराज धाबर्डे अन्न सुरक्षा अधिकारी वर्धा यांनी पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनामध्ये 01) सुगंधित तंबाकू – गोल्ड ब्रॅंड -60 सिलबंद पँकेट,प्रति पँकेट 250 / रु प्रमाणे एकूण 15000/-, वजन प्रति पॅकेट -500 ग्राम प्रमाणे एकूण वजन-30 किलो. 02)सुगंधित तंबाकू – होला हुक्का शीशा ब्रॅंड -40 सिलबंद पँकेट,प्रति पँकेट 1325 / रु प्रमाणे एकूण 53000/-, वजन प्रति पॅकेट -1 किलो प्रमाणे एकूण वजन-40 किलो. 03) सुगंधित तंबाकू – रिमझिम ब्रॅंड -10 सिलबंद पँकेट,प्रति पँकेट 550/ रु प्रमाणे एकूण 5550/-, वजन प्रति पॅकेट -1 किलो प्रमाणे एकूण वजन-10 किलो. 04 ) सुगंधित तंबाकू – इगल होला हुक्का शीशा ब्रॅंड – 120 सिलबंद पँकेट,प्रति पँकेट 850 / रु प्रमाणे एकूण 1,02,000/-, वजन प्रति पॅकेट -420 ग्राम प्रमाणे एकूण वजन- 50.4 किलो. असा संपुर्ण मालाचे वजन 130.4 किलोग्रॉम, असा एकुन 1,75,500/- रु चा सुंगंधीत तंबाखु व  एक जुनी  मारूती सुझकी कंपनीची व्हॅगनर गाडी क्र. एमएच 31 सीएन 6617 किंमत 2,00,000 रू असा किंमत 3,75,500/- रू चा  माल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करून रविराज धाबर्डे अन्न सुरक्षा अधीकारी वर्धा यांचे तक्रारीवरुन गुन्हा नोंद करून आरोपी शेख अरबाज अब्दुल जब्बार वय 28 वर्श रा. मौलाना आझाद वार्ड, पांढरकवडा ता. केळापुर जि. यवतमाळ यास अटक करण्यात आली.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक साहेब, व मा. देवेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक हिंगणघाट सुशील नायक यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे सपोनी पद्ममाकर मुंडे, पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, सुनिल मेंढे, नापोशि राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, रोहीत साठे, मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गून्हयाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!