देशी दारुची वाहतुक करणारा हिंगणघाट डी बी पथकाने मुद्देमालासह ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरीत्या देशी दारुची मोठी खेप हिंगणघाट येथे टाकतांना नाकाबंदी करुन घेतले ताब्यात,चारचाकी वाहनासह ४.११ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…..

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाचे अनुषंगाने पोलिस  स्टेशन हिंगणघाट येथील डी बी  पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात दि. 03/08/2025 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना खबरी कडुन खात्रीशीर गोपनीय माहीती  मिळाली की, अजय हजारे नावाचा इसम हा त्याचे ताब्यातील मारूती सुझूकी एसएक्स 4 चारचाकी वाहनाने अवैद्यरित्या देशी दारूचा माल घेवून नंदोरी ते हिंगणघाट रोडने वाघसावली येथे येणार आहे,







अशा खात्रीशीर माहिती वरुन सदरची माहीती पोलिस निरीक्षक देवेद्र ठाकुर यांना देवून त्याचे आदेशाने सावली वाघ बसस्टाँप येथे पो स्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली असता काही वेळाने तिथे एक पांढ-या रंगाची मारूती सुझुकी चारचाकी वाहन येतांना दिसल्याने पोलीस स्टाँफचे मदतीने गाडीला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला असता त्याने त्याचे ताब्यातील चारचाकी वाहन थांबविल्यावर त्याचे नाव विचारले असता त्याने त्याने त्याचे नाव अजय वामन हजारे वय 43 वर्ष रा. आंबेडकर काँलेज जवळ आकाशवाणी रोड चंद्रपूर जि. चंद्रपूर असे सांगितले त्याचे जवळ असलेल्या चारचाकी वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात मागील सिटवर राँकेट देशी दारू कंपनीच्या एकुण 8 खर्डयाचे खोके प्रती खोक्यात 90 मिलीच्या 100 सिलबंद शिश्या प्रमाने 800 सिलबंद शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 96,000 रू व जूने  मारूती सुझूकी कंपनीचे एसएक्स 4 पांढ-या रंगाची चारचाकी वाहन क्र. MH 31 CR 7517 किं. 3,15,000/- रू .किं. 4,11,000 रू चा माल अवैदयरित्या वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.



सदरची कामगिरी ही.पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणऱ्घाट रोशन पंडीत,पोलिस निरीक्षक देवेद्र ठाकुर ठानेदार पोलिस स्चेशन  हिंगणघाट यांचे आदेशाने  येथील सपोनि दिपक वानखडे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोहवा  प्रशांत ठोंबरे, नापोशि राजेश शेंडे, पोशि आशिष नेवारे,मंगेश वाघमारे, रोहीत साठे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!