
ईलेक्ट्रॅानिक मशीनच्या साहाय्याने जुगार खेळविणार्या तिन गेम पार्लरवर हिंगणघाट पोलिसांचा छापा…
ईलेक्ट्रॅानिक कॅाईन मशीनच्या सहाय्याने गेम पार्लर मधे जुगार खेळणार्यावर डी बी पथकाची कार्यवाही,तिन ठिकाणी छापा टाकुन ७.७ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दिपक वानखेडे हे डि बी पथकासोबत दि 26 जुलै रोजी सायंकाळी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी प्राप्त झाली की हिंगणघाट शहरातील दवाखाना चौक तसेच गोलबाजार लगत असलेल्या टिनाच्या दुकानात इतेक्ट्रानिक कॅाईन मशीन वर चाबीचा वापर करुन मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैसे लावुन पैशाचा हारजितीचा जुगार खेळवत आहे



अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहीती ठाणेदार देवेंद्र ठाकुर देऊन त्यांचे आदेशाने सपोनि दिपक वानखेडे व डीबी पथकाने नमुद ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी इलेक्ट्रानिक कॅाईन मशीन वर चावीचा वापर करून मशीनवर जुगारखेळ खेळत असतांना आरोपी क्र 1) आदर्श गवळी 2) विजय रघाटाटे 3) किशार तैंलकोजवार थ) संजय सोनकुसरे हे मिळुन आले तसेच 5) दुकान मालक प्रमोद मुंढे पसार झाला सदर ठिकाणावरुन 10 इलेक्ट्रॅानिक कॅाईन मशींन व इतर असा एकुन 264800/-/ रू चा मुद्देमाल जप्त करप्यात आला आहे,

तसेच दुसर्या एका कार्यवाहीत शहरातील गोलबाजार परिसर येथे सपोनि दिपक वानखेडे तसेच पो स्टॉप पो.हवा अनुप टपाले, .गणेश वैदय नापोशि असिम शेख. विवेक वाकोडे पोशि.पराग आत्राम, राजंद्र ढगे कुष्णा माणे, संतोष लोहटे दिपक हाके, यानी छापा टाकुन आरोपी क्र.01) आशिष पाराशर 2) अनंता भिमनवार 3) शेख नबी 4) ईरफान खॉन 5) राजा मखरे, 6) गजानन कारटकर असे मिळुन आले त्याचेताब्यातुन इलेक्टॅानिक क्वॉईन मशीनव इतर असा एकन 290330/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
तसेच तिसर्या एका कार्यवाहीत हिंगणघाट शहरातील गोलबाजार परिसरात पोउप नि सुनिल राम तसेच पोरटॉप पो हवा प्रविन बावने,नापोशि नरेन्द्र आरेकर,निलेश सुर्यवंशी,संतोष गीते,सागर सांगोले यांनी छापा टाकुव आरोपी 1) विशाल माथनकर 2)रितेश खडतकर 3)अर्पित मेढे 4) गौरव मडावी असे मिळुन आत्याने त्यांचे ताब्यातुन 9 ईलेक्टॅानिक कॅाईन मशीन इतर असा एकुन 222.130/- रू माल जप्त करण्यात आला असा एकुन 7.77.260/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरच्या तिन्ही कार्यवाही मघे आरोपीतांनवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे नौंद करप्यात आले व पुढील तपास सुरु आहे

सदरच्या तिन्ही कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,उपविभागिय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर यांचे निर्देशनाखाली सपोनि दिपक वानखेडे व डीबी पथकाने केली



