
मोटारपंप चोरणारी टोळी हिंगणघाट पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद…
शेतातील मोटारपंप चोरणारे सराईत चोरटे हिंगणघाट पोलिसांनी केले जेरबंद….
हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 19/2/25 रोजी फिर्यादी मनोज शांताराम खडसे रा. सेलू मोरपड यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की , कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहिरीवर टर्बो कंपनीचे मोटर पंप कि.2000/- रू, तसेच बाजूचे शेतकरी आशिष दिगंबर वैद्य यांचे शेतातील विहिरीवरील एक टर्बो कंपनीची मोटर पंप कि.7000/- रू असा एकून जू कि.9000/- रू चे मोटार पंप दिनांक 18./ 2./ 25 ते 19./2/.25 चे रात्र दरम्यान चोरून नेले आहे. असा रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन हिंगणघाट येते अपराध क्रमांक 277/25 कलम 303 (2)BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये दिनांक 19/4/2025 रोजी आरोपी 1) रोहन किशोर पंढरपुरे वय 22 वर्ष 2)चेतन माधवराव फरकाडे वय 25 वर्षे दोन्ही राहणार पोथरा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हा संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी दोघांनी मिळून फिर्यादी व त्यांचे बाजूचे शेतकरी आशिष वैद्य यांच्या दोघांचेही शेतातील विहिरीवरील दोन मोटर पंप चोरून नेला व तो व एक मोटर पंप खांबाडा येथे व दुसरां मोटर पंप टेंभुर्डा तालुका वरोरा येथील भंगार दुकानदार ला विकल्याचे सांगितले. वरून दोन्ही आरोपींचा पीसीआर घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे चोरलेल्या दोन्ही मोटार पंप भंगार दुकानदार यांच्याकडून जप्त करून, तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत दहा हजार रु असा एकून किंमत 17000/- रु माल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.


सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाच रोशन पंडित, ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाच पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार नरेंद्र डहाके, चंद्रशेखर वाढवे, विवेक वाकडे, विशाल बंगाले, दीपक हाके, आशिष कांबळे विजय काळे यांनी केली



