घरकाम करणारी महीलाच निघाली चोरटी,डॅा सिंघवी यांचेकडे झालेल्या चोरीचा डी बी पथकाने केला उलगडा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटातील दागिने चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,घरकाम करणार्या महीलेनेच केली चोरी..

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट शहरातील बालरोग तज्ञ डॅा प्रमोद पारसलाल सिंगवी वय 51 वर्ष रा. जैन मंदिर वॉर्ड हिंगणघाटयांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की, दि. 27 एप्रिल 2025 रोजी ते त्यांच्या मुलीचे डिबेट कॉम्पिटिशन करता मुंबई येथे गेले असताना व त्याच दिवशी त्यांच्या पत्नी ह्या सकाळी नऊ वाजता पासून सायंकाळी पावेतो दवाखान्यात पेशंट तपासनी करीत असताना त्यांचे पत्नीने बेडरूम मध्ये लाकडी अलमारीचे ड्राव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने1) गळ्यातील सोन्याचे पदक काळेमणी असलेले अंदाजे 15 ग्रामचे मंगळसूत्र किंमत 1,90, 000/- रु 2) हातातील सोन्याचे ब्रेसलेट अंदाजे 11 ग्रॅम किंमत 1, 66, 000/- रु 3) अमेरिकन डायमंड असलेली अंदाजे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी की 30,000/-  रू 4) अमेरिकन डायमंड असलेली अंदाजे चार ग्राम वजनाची सोन्याची अंगठी किंमत 24, 000/- रु असा एकुन किंमत 4,10,000/ रु माल दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. अशा डॅा सिंघवी यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन हिंगणघाट येते सदरचा गुन्हा नोंद करून तपास सुरु होता





सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपी शोध कामी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने ठाणेदार पोलिस निरीक्षक देवेंन्द्र ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथकाने  तांत्रिक पद्धतीने तपास करीत असता शोध घेतला असता फिर्यादी डॅा सिंघवी यांचे घरी काम करणारी महिला संशयीत रित्या दिसून आल्याने तिला निष्पन्न करुन तिचे घरी जाऊन तिला महिला पोलिस अंमलदार माला मैद हिचे मदतीने ताब्यात घेवून तिला तिचे नाव, पत्ता विचारले असता तिने तिचे नाव सौ. ममता सतीश कावडकर वय 40 वर्ष रा. हिंगणघाट. जि. वर्धा असे सांगितल्याने हिला ताब्यात घेवून तिचे घराची पंचा समक्ष घरझडती घेतली असता तिचे घराचे लोखंडी आलमारीत एका पर्समध्ये 1) ) गळ्यातील सोन्याचे पदक काळेमणी असलेले अंदाजे 15 ग्रामचे मंगळसूत्र किंमत 1,90, 000/- रु 2) हातातील सोन्याचे ब्रेसलेट अंदाजे 11 ग्रॅम किंमत 1, 66, 000/- रु 3) अमेरिकन डायमंड असलेली अंदाजे पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी की 30,000/-  रू 4) अमेरिकन डायमंड असलेली अंदाजे चार ग्राम वजनाची सोन्याची अंगठी किंमत 24, 000/- रु असा  किंमत 4,10,000/ रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला. असुन सदर महीलेस अटक करण्यात आली असुन पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय  पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकुर ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे इंचार्ज पोउपनि भारत वर्मा , डी.बी प्रमुख पोलिस हवालदार प्रशांत ठोबरे,नापोशि  राहुल साठे, पोशि आशिष नेवारे,मंगेश वाघमारे, महिला पोलीस अंमलदार  माला मैद यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!