
ओडीसा राज्यातुन गांजाची तस्करी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
वर्धा शहरात ओरीसा राज्यातुन विक्री करीता येणारा अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही,तीन आरोपींसह ५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत….
वर्धा(प्रतिनिधी) – अंमली पदार्थाची तस्करी करणारे तसेच त्याची किरकोळ विक्री करणारे यांचे कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलुस निरीक्षक विनोद चौधरी यांना दिले होते त्याअनुषंगाने त्यानी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास तशा सुचना दिल्या होत्या


त्याअनुषंगाने दि. 04/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्दीत शहरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना सुत्नानुसार गोपनीय माहीती मिळाली की काही ईसम ओडीसा येथुन अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणार आहे व वर्धा येथील रेल्वे स्टेशनवर उतरनार आहे यावरुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून वर्धा रेल्वे स्टेशन गेट समोरील, वर्धा ते सावंगी मेघे रोडलगत असलेल्या दयासागर अंडा स्टॉल दुकाणाजवळ सापळा रचला असता यातील दोन ईसम मोठ्या बॅगसह उतरले

त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) सुरज शंकरसिंग चव्हाण, वय 27 वर्ष, रा. बंगाली कॅम्प हनुमान मंदिराचे मागे इंदिरानगर रोड चंद्रपुर, ह.मु. ए.एम. मॉलचे मागे बेसा टि-पॉईंट २) विजय नामदेराव दुधकवरे, वय 33 वर्ष, रा. मोहन कलसे यांचे घराजवळ इंदिरानगर आर्वी नाका वर्धा, असे सांगीतले त्यांचेजवळील बॅगची तपासनी केली असा त्यात अंमली पदार्थ गांजा एकुन 20.111 किलोग्रॅम कि. 4,02,220/- रू मिळुन आल सदर आरोपी 1) यश सुरेश बेमाल, वय 28 वर्ष, रा. सावंगी मेघे, राजु नगर देवळी रोड वर्धा व २) अमिर नाशिर खॉ पठान रा. इंदिरानगर आर्वी नाका वर्धा यांचे सांगणेवरून रेल्वेने ओडिसा येथे गेले व तेथुन त्यांनी आरोपी मदन सा नावाचा ईसमाकडुन गांजा अंमली पदार्थ खरेदी केला व तो दोन सुटकेसमध्ये भरून, वर्धा रेल्वे स्टेशन येथे परत आले.

सदरचा गांजा घेण्याकरीता आरोपी यश बेमाल व अमिर पठान हे सुध्दा घटनास्थळी त्यांचे कार ने हजर आले होते, आरोपी अमिर पठान यास पोलिसांची चाहुल लागताचं तो त्याचे ताब्यातील एका पांढ-या रंगाचे मारूती स्विफ्ट कारसह पळुन पसार झाला असुन, उर्वरित तिन्ही आरोपींना ताब्यात घेवुन, जप्तीपंचनामा कार्यवाही करून आरोपींचे ताब्यातुन अंमली पदार्थ गांजासह १) एक आयफोन मोबाईल कि. 80,000/- रू २) एक रेडमी कंपनीचा ॲॅन्ड्रॉईड मोबाईल कि. 10,000/- रू ३)) एक जिओ कंपनीचा कीपॅड मोबाईल कि. 3,000/- रू ४) दोन सुटकेस कि. 8,000/- रू, असा एकुन. 5,03,220/- रू चा मुद्देमाल. जप्त करून, सर्व आरोपी. विरूध्द पोलिस स्टेशन, वर्धा शहर येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, जप्त मुद्देमाल व आरोपींना पुढील कारवाई करीता पो. स्टे. वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखे चे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनात पो.उपनि. प्रकाश लसुंते, बालाजी लालपालवाले, पोहवा मनोज धात्रक, अरविंद येनुरकर नापोशि रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे, अजित धांदरे व पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.


