
सराईत चैन स्नॅचरची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,९ गुन्ह्यासह ६ लाखाचे वर मुद्देमाल केला हस्तगत….
चैन स्नॅचिंग करणाऱे सराईत चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,नागपुर,अकोला संभाजीनगर, जालना येथील 9 गुन्हे केले उघड, 6,22,343/-रु चा मुद्देमाल केला जप्त…..
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.15 वा. चे सुमारास देवरणकर ले आउट सहकार नगर वर्धा येथे राहणाऱ्या नलिनी प्रभाकर पारखी वय 72 वर्षे या महिला त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेशी बोलत असता दोन अनोळखी युवक काळ्या रंगाच्या मोटर सायकलने आले व फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचा गोफ किं. 68000/- रु. चा हिसकावुन घेवुन पळुन गेले. अश्या फिर्यादी नलिनी प्रभाकर पारखी वय 72 वर्षे यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन रामनगर येथे अप.क्र. 258/2025 कलम 304(2), 3(5) बि.एन.एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता


सततच्या होणार्या घटनेच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक बाबींचे निरीक्षण करुन दि. 22.04.2025 रोजी गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती प्राप्त झाली की, दोन अनोळखी इसमाजवळ चोरीचे सोने असुन ते आष्टी येथुन मोर्शी चौरस्ता मार्गे अंतोरा कडे जात आहे. अशा माहितीवरून मौजा आष्टी येथील मोर्शी फाट्याजवळ नाकेबंदी करून संशईतांना थांबवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) वैभव नारायण अडोळे, वय 25 वर्ष, रा. येरला ता. मोर्शी जि. अमरावती 2) रोहन मोहनराव हुनकर, वय 22 वर्ष, रा. येरला ता. मोर्शी जि. अमरावती असे सांगीतले त्यावरुन त्यांना ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी जिल्हा जालना येथून मोटर सायकल चोरी करून त्या मोटर सायकलने खालील प्रमाणे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे

1) पो. स्टे, रामनगर जिल्हा वर्धा येथील अप, क्र. 258/2025 कलम 304(2), 3(5) बि.एन.एस 2) पो.स्टे. वर्धा शहर जिल्हा वर्धा येथील अप. क्र. 206/2025कलम 304(2), 3(5) बि.एन.एस 3) पो.स्टे. वर्धा शहर जिल्हा वर्धा येथील अप. क्र. 481/2025 कलम 304(2), 3(5) बि.एन.एस.. 4) पो.स्टे. नंदनवन जिल्हा नागपूर येथील अप. क्र. 135/2025 कलम 304, 3(5) बि.एन.एस. 5) पो.स्टे. खदान जिल्हा अकोला येथील अप. क्र. 314/2025 कलम 309(4) 3,(5) बि.एन.एस. 6) पो.स्टे. खदान जिल्हा अकोला येथील अप, क्र. 318/2025 कलम 309(4) 3,(5) बि.एन.एस. 7) पो.स्टे. जवाहर नगर जिल्हा संभाजीनगर येथील अप. क्र. 119/2025 कलम 309 (4) 3(5) बि.एन.एस. 8) पो.स्टे. जवाहर नगर जिल्हा संभाजीनगर येथील अप. क्र. 121/2025 कलम 309 (4) 3(5) बि.एन.एस. 9) पो.स्टे. एस बी जिल्हा जालना येथील अप. क्र. 252/2025 कलम 303 (2) बि.एन.एस.

वर नमुद दोन्ही आरोपींनी वरील प्रमाणे गुन्हे केलेले असुन आरोपी क्र. 3) राहुल रमेशराव वानखेडे, वय 33 वर्ष, रा. अंतोरा ता. आष्टी जि. वर्धा यांचे मार्फतीने सदर गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावून घेतली आहे. यातील नमुद तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचे ताब्यातून 1) एक पिवळ्या धातूची जुनी वापरती चेन अंदाजे वजन 10 ग्रॅम कि. 80,000/-रू 2) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाजे वजन 18 ग्रॅम किं. 68,000/- रू 3) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाजे वजन 16 ग्रॅम किं. 90,000/- रू 4) एक पिवळ्या धातूची छोटे पदक असलेली पोत अंदाजे वजन 13 ग्राम किं. 65,000/- रू 5) एक पिवळ्या धातूचा स्वा अंदाजे वजन 08 ग्रॅम किं. 26,343/- रू. 6) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाजे वजन 08 ग्रॅम किं. 60,000/- रू. 7) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाजे वजन 20 ग्रॅम किं. 1,50,000/- रू 8) एक पिवळ्या धातूचा रवा अंदाजे वजन 07 ग्रॅम कि. 30,000/- रू 9) एक जुनी वापरती ग्रे रंगाची होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल बिना क्रमांकची किं. 30,000/रू, 10) एक जुना वापरता पोपटी रंगाचा विवो कंपनीचा सिम कार्ड नसलेला अँड्रॉइड मोबाईल किं. 12,000/- रू. 11) एक जुना वापरता पांढऱ्या रंगाचा रियल मी कंपनीचा सिम कार्ड नसलेला अँड्रॉइड मोबाईल किं. 11,000/- रू असा एकूण 6,22,343/-रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १ वैभव नारायण अडोळे, वय 25 वर्ष, रा. येरला ता. मोर्शी जि. अमरावती हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर महाराष्ट्रात चोरी, घरफोडी, अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी इत्यादी प्रकारचे बरेच गुन्हे नोंद असुन आरोपींकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी,पोउपनि, प्रकाश लसुंदे, पोहवा शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, पेशि विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल व सायबर सेल, वर्धा येथील दिनेश बोथकर, अंकित जिभे, गोविंद मुंडे यांनी केली आहे.


