अंमली पदार्थ गांजासह एकास घेतले ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अंमली पदार्थ गांजाची  विक्री करीता वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात,१.२५ किलो गांजा जप्त….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,नशेखोरीच्या आहारी जाणारी युवापिढी हा चितेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अशा प्रकारचे नशेचे सेवन करणारे व पुरवठा करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास देण्यात आले होते







त्याअनुषंगाने दि. 02/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलिस स्टेशन रामनगर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता रात्र पेट्रोलिंग करीत असतांना, गोपनीय माहिती मिळाली की एक ईसम आर्वी नाका ते धुनिवाले मठ बॅचलर रोड ने अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणार आहे अशा त्यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन साई मंदिर जवळ, आदिवासी कॉलनी कडे जाणा-या रोडवर सापळा रचला असता एका ईसमास अंमली पदार्थ गांजा पदार्थाची वाहतुक करतांना मिळुन आला असुन, त्याचे पाठीवर असलेल्या एका स्कुल बॅगमध्ये अंमली पदार्थ 1,225 किलोग्रॅम कि. 24,500 गांजा मिळुन आला.



सदर ईसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मंगेश उर्फ जॉन शंकरराव कोकाटे, वय 37 वर्ष, रा. वार्ड नं. 04 आदीवासी कॉलनी वर्धा असे सांगीतले त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा अंमली पदार्थ हा 2) यश नावाचा ईसम रा. सावंगी मेघे वर्धा याचेपासुन खरेदी केल्याचे सांगितल्याने यावरुन सदर ईसमाचे ताब्यातुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 1,225 किलोग्रॅम कि. 24,500 रू 2) एक बजाज 220 पल्सर मोटर सायकल क्र. एम.एच. 49 बी.जे. 7866 कि 1,50,000 रू 3) एक विवो कंपनीचा ॲन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू 4) एक स्कुल बॅग कि. 300 रू, असा जु.कि. 1,89,800 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द पोलिस स्टेशन रामनगर येथे एन.डि.पी.एस.कायदा 1985कलम 8(क), 20(ब) ii(ब), 29 एन.डी.पि.एस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व  पुढील तपास पोलिस स्टेशन रामनगर करीत आह



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रकाश लसुंते,पोहवा अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, गजानन दरणे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे व पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!