
स्थानिक गुन्हे शाखेचा गिरड परीसरात जुगार अड्डयावर छापा,५० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…
स्थानिक गुन्हे शाखेने गिरड हद्दीतील जुगार अड्यावर छापा टाकून आलीशान महागड्या वाहनासह एकुण 50,15,860 रूपयाचा मुद्देमाल केला जप्त,२३ जुगारी ताब्यात….
गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना गिरड पोलिस स्टेशन हद्दीत मौजा फरीदपुर येथे अशोक गड्डमवार हा त्याचे साथीदारसह मोठ्या प्रमाणात जुगार भरवित असल्याबाबत गोपनीय माहीती मुखबिरकडून मिळाली सदर बातमीची शहानिशा करुन दि. 23/09/24 चे रात्र दरम्यान रात्रभर पाळत ठेवून हालचालीवर लक्ष ठेवुन वेगवेगळी पथक तयार करुन सापळा रचला व मौजा फरीदपूर येथील शेतातील बंडयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर जुगार अड्ड्यावर चारही बाजुने घेराव करुन छापा टाकला


सदर जुगार अड्ड्यावर जुगार खेळतांना खालील ईसम मिळुन आले 1)सलिम शेख गफ्फार शेख वय 29 वर्षे रा पुलफैल वर्धा 2) राजु नथ्थुजी नौकरकर वय 52 वर्ष रा. गिरड 3)पांडुरंग रामाजी फलके वय 42 वर्ष रा. धगडबन 4) रामलाल भगवानजी गंडे वय 40 वर्ष रा. गिरड 5) आतिश विक्रम रामटेके वय 38 वर्ष रा. नंदोरी 6) विशाल अशोक रोहणकर वय 27 वर्ष रा. वार्ड नं. 3 गिरड 7) सचिन आनंदराव धारणे वय 25 वर्ष रा. कोरा 8) अंकित चंद्रशेखर ढोक वय 23 वर्ष रा. कोरा 9) अरुन विठ्ठल सावरकर वय 50 वर्ष रा. नंदोरी 10) प्रकाश बापुरावजी लोहट वय 45 वर्ष रा. गिरड 11) कवडु नारायन नंन्नवरे वय 30 वर्ष रा. फरिदपुर 12) योगेश महादेव महाकाळकर वय 56 वर्ष रा. हिंगणघाट 13) रोशन राजु नारनवरे वय 20 वर्ष रा. कोरा 14) प्रेमदास लहुजी चांग वय 27 वर्ष रा. गिरड 15) राजु उर्फ राजेश हरिभाऊ तिमांडे वय 44 वर्ष रा. तरोडा 16) महेंद्र किसनजी झाडे वय 38 वर्ष रा. समुद्रपुर 17) वैभव रमेशराव मेहता वय 35 वर्ष रा. सुरगांव (रेहकी) 18) जगदिश मुधुकर रोकडे वय 34 वर्ष रा. सेलु 19) रुपेश अरुण घोडे वय 32 वर्ष रा. बरबडी 20) प्रफुल देवरावजी बोरीकर वय 40 वर्ष रा. गिरड 21) जितेंद्र उर्फ जितु मधुकर झाडे वय 35 वर्ष रा. नंदोरी 22) मंगेश कुंडलिक खाटीक वय 43 वर्ष रा. गिरड 23) सचिन ब्रम्हानंद लोखंडे वय 31 वर्ष रा. कोरा असे व 24) डिस्कव्हर गाडी क. एमएच 32 यु 4001 चा चालक (पसार) हे 52 तास पत्यावर पैशे लावून हारजीतचा खेळ खेळतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन जुगाराचे नगदी 2,16,860/-रु., 22 मोबाईल संच किंमत.3,04,000/-रु., 6 चारचाकी वाहन व 6 दुचाकी वाहने किंमत 44,95,000/-रु. असा एकुण 50,15,860/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदर आरोपींना जुगार अड्ड्याबाबत सखोल विचारपूस केली असता हा जुगार अड्डा हा गिरड येथे राहणारा अशोक गड्डमवार, हा त्याचे साथीदार विशाल बहादूरें रा. धोंडगाव, विलास लभाने रा. गिरड तसेच शेत मालक सुधिर धानोरे रा. फरिदपुर यांनी संगनमताने 52 तास पत्त्यावर मांग पत्याच्या जुगारावर पैश्याची बाजी लावुन स्वताचे आर्थिक फायदया करीता जुगार भरविलेला आहे. असे एकुण 28 आरोपी विरुध्द जुगार कायद्यान्वये पोलीस स्टेशन गिरड येथे गुन्हा नोंद करण्यात आला

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक स्थागुशा विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पोलिस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, गजानन लामसे, सचिन इंगोले, भुषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, विकास मुंडे, गोपाल बावनकर, अमोल नगराळे, अभिषेक नाईक, मुकेश ढोके, दिपक साठ, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के, मंगेश आदे, शुभम राऊत, राहुल अघवाल यांनी केली


