प्रतिबंधित अशा सिगारेटची विक्री करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणार्या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही…

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आजकालच्या तरुन पिढी मधे नशेचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळतय त्यातल्या त्यात सिगारेटच्या झुरक्यात तरुण पिढी वाहतांना दिसतेय अशा प्रतिबंधित सिगारेटवर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींना दिल्या होत्या त्यानुसार स्थागुशा पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी आपले अधिनस्त असलेल्या पथकास योग्य त्या सुचना दिल्या





त्याअनुषंगाने दि 28 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करनेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना गोपनीय माहीती मिळाली की मेन रोड बडे चौकात रितेश साहु नामक व्यक्तीचे वैष्णवी ट्रेडर्स नामक दुकानात अवैधरित्या प्रतिबंधित अशा सिगारेटचा साठा व विक्री होते अशा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे  रितेश शाहु याचे मालकिचे वर्धा शहरातील मेन रोड बढे चौक जवळ, गणेश मंदिर समोर असलेल्या वैष्णवी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकुन त्याची झडती घेतली असता, झडती दरम्यान दुकानाचे काऊंटर खाली व गोडावुन मध्ये शासनाने ठरवुन दिलेल्या कोणताही लेखी अथवा चित्रीत केलेला वैधानिक ईशारा नसलेले व त्यावर त्याच्या उत्पादनाबाबत तसेच कालबाह्य मुदतीबाबत काहीही नमुद केले नसलेले व शासनाने प्रतिबंधीत केलेले विदेशी सिगारेटचे बॉक्स व पॅकेट मिळुन आले.



नमुद सिगारेट चा माल त्याने जगदिश किराणा स्टोअर्स, नागपुर येथुन खरेदी केल्याचे सांगितल्याने,घटनास्थळावर जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपीचे ताब्यातून 1) mond कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे विदेशी सिगारेटचे 104 बॉक्स, कि. 1,04,000/- रू. 2) BLACK कंपनीचे विदेशी सिगारेटचे 18 बॉक्स, कि. 18,000/- रू. 3) ESSE कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे विदेशी सिगारेटचे 11 बॉक्स, कि. 11,000/- रू. 4) GARAM कंपनीचे विदेशी सिगारेटचे 08 बॉक्स, कि. 16,000/- रू. एकुण कि. 1,49,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, आरोपी रितेश बन्शीलाल शाहु, वय 50 वर्ष, रा. मोहन नगर महालक्ष्मी रेसीडेन्सीच्या मागे वर्धा व जगदिश किराणा स्टोअर्स, नागपुर चा मालक यांचेविरूध्द पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  अनुराग जैन., अपर पोलिस अधिक्षक. डॉ सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखे चे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नि. राहुल इटेकर, पोहवा मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रवि पुरोहित, विनोद कापसे, राहुल लुटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!