धारदार शस्त्रे घरी बाळगणार्याच्या रामनगर डी बी पथकाने आवळल्या मुसक्या….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

एक धारदार तलवार व एक धारदार चाकु घरी बाळगणारा रामनगर पोलिसांचे ताब्यात….

रामनगर(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या होळी सणाचे अनुषंगाने अवैध धंदे कार्यवाहीकरीता पेलिस स्चेशन रामनगर येथील डी बी पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की शांतीनगर उमरी मेघे वर्धा येथे राहनारा केशव उर्फ राज गजाननराव वानखेडे  हा काहीतरी गंभीर  गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याचे घरी तलवार व चाकू ठेवून आहे.





अशा खात्रीशीर माहितीवरून शांतीनगर उमरी मेघे वर्धा येथे त्याचे घराची पंचा समक्ष घर झडती घेतली असता घर घडतीत 1) दोन सोनेरी रंगाच्या मूठ असलेल्या धारदार लोखंडी तलवारी, 2) एक लोखंडी धारदार पाते असलेला चाकू असा किंमत 5000/रु चा माल मिळून आला सदर आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन रामनगर येथे अप क्रमांक 182/2025 कलम 4,25 भा ह का, अन्वये गुन्हा दाखल करून सदर आरोपीला गुन्ह्यात अटक केली.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक बिपीन ईंगळे ठाणेदार पोलिस स्टेशन रामनगर यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोहवा गिरीश चंदनखेडे, पोलिस अंमलदार अमोल राऊत, अमोल गीते, चेतन पापळे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!