
अल्लीपुर पोलिसांची रेती तस्करावर मोठी कार्यवाही,४० लाखाचा मुद्देमाल जप्त…
अल्लीपुर पोलिसांची रेतीची अवैध वाहतुक करणार्यावर कार्यवाही,७.५ ब्रास रेतीसह ४० लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हयात सभोवताली नदी वाहत असुन त्यमधुन अवैधरित्या होणारी रेतीची चोरटी वाहतुक हा पोलिसासाठी मोठा प्रश्न आहे तरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे मार्गदर्शनाखाली पुलगाव उपविभागात धडाकेबाज कार्यवाही सुरु आहे


त्याअनुषंगाने दि 09. जुन 2025 रोजी रात्र गस्ती दरम्यान मध्यरात्री २.३० ते ४.३० वा चे दरम्यान पोलिस अधिक्षक व सहाय्यक पोलिस अधिक्षक, राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात कोसुर्ला गावा जवळ प्रभारी ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपुर सपोनि विजयकुमार घुले, पोउपनि अष्विन खेडीकर, पोहवा अजय रिठे, यांनी पोलिस स्टेशन अल्लीपुर हद्दीतुन होत असलेल्या अवैद्यरित्या विना पास परवाना रेती ची चोरटी वाहतुकीवर आळा घलण्याचे दृश्टीने नाकाबंदी केली असता दोन टिप्पर येतांना दिसले त्यांना थांबवुन त्याची तपासनी केली असता आरोपी हे संगनमताने आपले ताब्यातील नमुद टिप्परने ने अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करीत असतांना कोसुर्ला गावा जवळ मिळुन आल्याने टिप्पर चालक व मालका १) गणेश लक्ष्मण आत्राम, वय 47 वर्षे, रा. देवळी ता. देवळी जि. वर्धा २) गुरूदेव मोतीराम देशमुख, वय 48 वर्षे, रा. देवळी ता. देवळी जि.वर्धा यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून पो.स्टे – अल्लीपुर येथे अप क्र.- 308/2025 कलम -303(2), 3 (5) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला

तसेच दोन पंचासमक्ष घटनास्थळ जप्तीपंचनामा कार्यवाही प्रमाणे टीप्पर क्रमांक एम.एच. 36 एफ 8799 किंमत 20,00,000/- रू. एक टीप्पर क्रमांक एम.एच. 27 एक्स 3896 किं 20,00,000/- रू.व 7. 6 ब्रास रेती किंमत 30,000/- रू असा एकुण जुमला किंमत 40,30,000/-रू चा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुलगाव राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजयकुमार घुले ठाणेदार पोलिस स्टेशन अल्लीपुर पोउपनि अष्विन खेडीकर, पोहवा अजय रिठे यांनी केली


