अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणार्या ट्रकवर सावंगी मेघे पोलिसांची मोठी कार्यवाही,दोघे अटक….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सावंगी मेघे पोलिसांनी अवैद्यरित्या जनावरांची वाहतुक करणारा ट्रक ताब्यात घेऊन, १० म्हैस व ०८ बछडयांची केली सुटका…

सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करा असे पोलिस अधिक्षक  अनुराग जैन यांचे आदेशानुसार दिनांक ३१.०७.२०२५ रोजी ठाणेदार पंकज वाघोडे पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांना गोपनीय माहीती मिळाली की एक आयसर ट्रक क. एच.आर. ४५ डी ७१३४ ह्या चारचाकी वाहनाने जनावरांची वाहतुक होणार आहे







अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन ठाणेदार पंकज वाघोडे यांनी पो.उपनि. निलेश वाडीवा, पो.शि. अंकुश, अक्षय  यांनी मौजा येळाकेळी बसस्टॉप येथे जावुन नाकाबंदी करुन सदर क्रमांकाच्या ट्रकला पकडले असता ट्रकचे मागच्या डाल्यामध्ये १० काळ्या रंगाच्या म्हैस व ०८ म्हैसचे बछडे वाहनात विना परवाना वेदना होईल अशा रितीने वाहनात दाटीवाटीने कोंबुन तसेच त्यांचे तोंडाला नॉयलॉन रस्सीने बांधुन राज्य हरीयाना येथुन राज्य तेलंगना येथे ट्रकने वाहतुक करतांना मिळुन आले



सदर ट्रकचा चालक व मालक यांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून १० काळ्या रंगाच्या म्हैस व ०८ म्हैसचे बछडे यांना ताब्यात घेवुन त्यांना सुरक्षतेच्यादृष्टीने गौशाळा येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपी  १. अमितकुमार रामपाल (ट्रकचालक) रा. वाल्मीक मोहल्ला, हसनपुर, ता. करनाल राज्य हरियाना २)नविनकुमार विरंण्णा मुडावर, रा. बाधलापरई ता. थारीगोपुल्ला, जि. वरांगल तेलंगना यांचेविरूदध पो.स्टे. सावंगी मेघे, जि. वर्धा येथे अप क्र. ६१४/२०२५ कलम ११(१) (डी) (एफ) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ११९ महा. पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. पंकज वाघोडे ठाणेदार पो.स्टे. सावंगी मेघे, पो.उपनि. निलेश वाडीवा, पो.उपनि.गोपाल शिंदे, पो.शि. अंकुश, अक्षय, चालक आकाश  यांनी केली आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!