
अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या बाळगुन विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
अंमली पदार्थ गांजाची विक्री करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,१.१५ किलोग्रॅम गांजा हस्तगत….
सेलु(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली त्यानुसार



त्यानुसार, दि. 01/08/2025 रोजी स्था.गु.शाखेचे पथक पोलिस स्टेशन सेलु हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना गोपनीय माहीती मिळाली की किसनसिंग शेरसिंग उर्फ छोटुसिंग बावरी नावाचा ईसम शासकीय विश्रामग्रुहासमोर अंमली पदार्थ गांजाची विक्री करतोय व तो जवळ गांजा बाळगुन आहे

अशा मिळालेल्या गोपणीय माहितीवरून आरोपी क्र, 1) किसनसिंग शेरसिंग उर्फ छोटुसिंग बावरी वय 53 वर्ष, रा. शासकिय विश्रामगृह समोर वार्ड नं. 01 केळझर वर्धा याचे राहते घरी छापा टाकला असता तो घरी हजर होता त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घराचे झडती दरम्यान एका पिशवीतील पन्नीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला त्या सदरचा अंमली पदार्थ कोठुन आणला याबाबत विचारपुस केली असता सदरचा अंमली पदार्थ गांजा त्यास त्याचा मुलगा आरोपी क्र. 2) भोलासिंग किसनसिंग बावरी याने आणुन दिल्याचे सांगितले.

सदर दोन्ही आरोपी हे संगणमताने गांजा अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन निव्वळ गांजा अंमली पदार्थ 1.153 किलोग्रॅम जु.कि. 23,060 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेलु येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व आरोपीस पो.स्टे. सेलु यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत व आ.क्र. 2 भोलासिंग बावरी हा फरार असुन, त्याचा शोध स्था.गु.शा. वर्धा चे पथक घेत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. उमाकांत राठोड, पोहवा अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, राहुल लुटे, मुकेश ढोके, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



