सेलु पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,पाच जुगारीसह ३ लाखाचे वर मुद्देमाल केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सेलु पोलिसांचा हिंगनी शिवारात जुगार अड्डयावर छापा,५ जुगारींसह ३ लाखावर मुद्देमाल केला जप्त…..

सेलु(वर्धा)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी होळी सण तसेच येणारी लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध्य धंदे खपऊन घेतले जाणार नाही तसेच त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते





त्यानुसार दिनांक 16/03/2024 रोजी पोलिस स्टेशन सेलु येथील गुन्हे प्रकटीकरण पथक आपले दैनंदिन कार्यालयीन काम करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की हिंगणी शिवारात काही ईसम ५२ तासपत्त्यावर जुगार खेळत आहे अशा मुखबीर यांचे माहितीवरून सदर जुगारावर छापा टाकला असता असता तिथे आरोपी नामे



1)अनिकेत वामनराव गुरुनुले, वय-25 वर्ष, 2) प्रविण श्रीकृष्ण चौधरी, वय-21 वर्ष, 3) आकाश गणेश वाघाडे, वय-23 वर्ष,  4) निखील विठ्ठलराव चचाणे, वय-25 वर्ष,  5) प्रभाकर नागोराव बावणे, वय-50 वर्ष,



सर्व रा. हिंगणी, ता.सेलू, जि.वर्धा नमुद आरोपी हे मौजा हिंगणी शेत शिवारात 52 ताशपत्यावर पैशाचा हारजितचा जुगार खेळत असतांना मौक्यावर मिळून आल्याने सदर आरोपीतांचे ताब्यातून नगदी, मोबाईल, तसेच मोटारसायकल असा एकूण कि. 3,80,150/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपीतांविरुध्द पो.स्टे. सेलू येथे कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा  प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू, पोलिस हवा गणेश राऊत, अखिलेश गव्हाणे, नापोशि विक्रम काळमेघ, पोशि ज्ञानदेव वनवे, सैनिक नरेंद्र तेलरांधे, अंगत काळसर्पे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!