
खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग…
दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या नजीकच्या जिल्ह्यातील बारचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु अवैधरित्या दारुचा पुरवठा करणाऱ्या तस्करांना बसनार चाप…
वर्धा(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना बेकायदेशीर शस्त्रे, अवैध दारू किंवा अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी दिल्या आहेत. या मध्ये विशेषतः म्हणजे जिल्हयात सध्या दारूबंदी असून पण बाजूच्या जिल्ह्यातून दारु आणुन अन् छुप्या पद्धतीने विक्री करतात. या मध्ये वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर लगतच्या जिल्ह्यातील काही मोठे बार मालक व्यापारी वर्धा येथील दारु तस्करांना अवैधरित्या दारु विक्री करीता उपलब्ध करुन देत आहेत


यावर पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी रामबाण उपाय शोधुन काढलाय तो म्हनजे वर्धा जिल्ह्यात दारुचा साठा पुरविणारे सीमेवरील बार मालकांना आणि तस्करांना आरोपी व सह आरोपी करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८२ प्रमाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता, विशेष म्हणजे हॉटेल ढाब्यांवर बेकायदेशीरपणे होणारी दारू विक्री रोखण्यासाठी फक्त हॉटेल, हॉटेल मालकांवर कारवाई करून चालणार नाही, तर ही बेकायदा दारू विक्रीची पूर्ण साखळी आहे. त्यामुळे आम्ही हॉटेल मालक, दारू दुकानदार, तस्कर, जागा मालक आणि पुरवठा करणारा बार मालक या सर्वांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक यांनी पोलिसकाका न्युज शी बोलतांना दिली

हे सर्व करुनसुध्दा नजीकच्या जिल्ह्यातील बार मालक यांचेवर कार्यवाहीचा बडगा सुरुच आहे तरीही वर्धा जिल्हा दारुबंदी जिल्हा असुनही वर्धा येथील दारु तस्करांना दारुचा पुरवठा करणे थोड्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसते परंतु अजुनही काही मग्रुर बार मालक हे जैसे थे च्या भुमीकेत दिसताय म्हनुन आता पोलिस अधिक्षक नुरुल हसन त्यांचे पुढे जाऊन अशा बार मालकांवर कार्यवाहीचा एक भाग म्हनुन आता त्यांचे बारचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत

कोणत्याही परिस्थितीत बेकायदा अवैध दारूविक्री, चालू न देण्याची आमची भूमिका आहे. या आधी सुद्धा सर्व पोलिस ठाणे हद्दीत काही निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना संपर्क करून कळवावे, संबंधित बार मालकावर तत्काळ कारवाई केली जाईल. प्रसंगी बारचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा देऊ
कोणत्याही गावात, वस्तीवर, शहरात अवैध दारू विक्री केली जात असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणार्याचे नाव व गाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.


