
सांवंगी पोलिसांची दोन महीलांसह पाच सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कार्यवाही….
सांवगी मेघे पोलिसांची सात सराईत गुन्हेगारांना तसेच अवैध दारुविक्री करणार्यांना 2 वर्षाकरीता वर्धा जिल्यातून केले हद्दपार….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुक प्रस्थावित असतांना निवडनुक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरीता गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांवर जरब बसविने हे स्थानिक पोलिसांपुढे एक आव्हानच असते म्हनुन त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवुन त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचेच असते त्यांत संघटीत गुन्हेगार,गांजा,दारु विक्री करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगारही आलेच


त्याअनुषंगाने वर्धा शहरातील पोलिस स्टेशन सावंगी मेघे, वर्धा शहर, रामनगर, परीसरात दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने शरीराविरूध्द व मालमत्ते विरूध्द गुन्हे करणारे संघटीत गुन्हेगार 1) अक्षय दिगांबर पटले 2) अजय उर्फ तोतल्या वासुदेव राठोड 3) रंजितसिंग उपंद्रसिंग थुरवाल सर्व रा. बोरगाव मेघे वर्धा 4) रोशन सुनिल लिडबे 5) सौरभ बोरकर दोन्ही रा. सावंगी मेघे वर्धा यांच्यावर पो.स्टे सावंगी मेघे, वर्धा शहर पो.स्टे रामनगर या ठिकाणी शरीरा विरूध्द व मालमत्ते विरूध्द 30 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. नमुद आरोपी हे संघटीतपणे एकत्र येवून गुन्हे करण्याच्या सवईचे होते. त्यांच्यावर पायबंद घालण्याच्या उददेशाने तडीपारीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते

त्याचप्रमाणे पो.स्टे सावंगी मेंघे हद्दीत मौजा सालोड हिरापुर येथील संघटीतपणे अवैधरीत्या सराईत दारुविक्री करणारी शालू सुधिर खोब्रागडे वय 50 वर्ष व कांचन आकाश खोब्रागडे वय 32 वर्ष दोन्ही रा. सालोड हिरापुर ता.जि. वर्धा. यांचे विरूध्द पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील अभिलेखावर 40 पेक्षा जास्त दारूबंदी कायदयान्वये कारवाई करून गुन्हे नोंद करण्यात आले तसेच त्यांचेवर वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे, तरी सुध्दा ते या कारवाईला न जुमानता त्यांचा अवैध दारू विकीचा व्यवसाय सुरूच ठेवत होत्या त्याचा सर्वसामान्य जिवन व्यतीत करणारे नागरीकांना त्यांचेपासून अत्यंत त्रास असल्याने त्यांच्यावर पायबंद घालण्याच्या उददेशाने नमुद आरोपींवर तडीपारीची कारवाई करणे अत्यंत आवश्यक होते, त्यामुळे ठाणेदार सपोनि संदिप कापडे पो.स्टे सावंगी मेघे यांनी वरील सर्व आरोपी यांचे विरूध्द कागदोपत्री कारवाई करून हद्दपारी प्रस्ताव मा. वरीष्ठांकडे सादर केला. त्यावरू मा. वरीष्ठांनी नमुद सर्व सात ही आरोपींना कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये 02 वर्ष कालावधी करीता वर्धा जिल्हयाचे बाहेर, भद्रावती, चंद्रपुर, नेर जि. यवतमाळ, मंगरूळ दस्तगीर जि. अमरावती येथे हद्दपार केले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सपोनि संदिप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे पोउप.नि. नबी शेख, कैलास खोब्रागडे, पो.हवा सतिश दरवरे, संजय पंचभाई, सचिन घेवंदे, अनिल वैदय, निलेश सडमाके, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केली आहे.


