संशईत ईराणी ईसमास नागपुर येथुन LCB ने ताब्यात घेऊन वडनेर येथील हातचलाखीचा गुन्हा केला उघड….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बॅंकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणुक करणारा अट्टल इराणी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथुन  ताब्यात घेवुन गुन्हा  वडनेर येथील गुन्हा केला उघड…..

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वडनेर येथे राहणारे तक्रारदार  विठ्ठल कवडू कुबडे वय 67 वर्ष, रा. वडनेर हे दि. 13/05/2025 रोजी दुपारी वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते पैसे मोजत असताना एक अनोळखी ईसम त्यांचेजवळ आला व त्यांचे पैसे मोजण्यास हाती घेऊन हातचलाखी करून त्यांची फसवणुक केली.त्याअनुषंगाने  तक्रारदार विठ्ठल कवडू कुबडे यांचे ही बाब लक्षात येताच दि. 14/05/2025 रोजी पो. स्टे. वडनेर येथे  तक्रार दिल्याने अप क्र. 183/2025 कलम 318 (4) BMS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता





पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने सदर  गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखे चे पथक करीत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा कामठी येथे राहणाऱ्या इराणी वस्तीतील आरोपीने केला असल्याचे मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे दि.15/5/25 रोजी इराणी आरोपी नासिर अली आमीर अली, वय 45 वर्ष, रा. बाबा दिवानी मज्जित जवळ माडा चौक आजरी माजरी यशोधरा, जि. नागपुर यास त्याचे राहते घरून ताब्यात घेतले, त्यास कसून विचारपुस केली असता, आरोपीने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार शेख रफिक शेख युसुफ रा. नवाबपुरा लकडापुरा नागपूर याचे सह केल्याची कबुल दिली.



यावरुन आरोपी नासिर अली आमीर अली यास पुढील कारवाई करिता पो. स्टे वडनेर यांचे ताब्यात देण्यात आले.आह



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॉ . सागर रतनकुमार  कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विनोद चौधरी,पोलिस हवा शेखर डोंगरे, सचिन इंगोले,पोलिस अंमलदार  प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!