
SDPO यांचे पथकाने ईतवारा येथे पकडला विदेशी दारुचा साठा…
वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय वर्धा यांचे विशेष पथकाने बुरड मोहल्ला वर्धा येथे छापा टाकुन जप्त केला लाखोचा विदेशी दारूचा साठा….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन-उत्सवाच्या अनुषंगाने नुतन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांनी त्यांचे कार्यालयातील विशेष पथकास योग्य त्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक 03.09.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की बुरड मोहल्ला, इतवारा बाजार वर्धा येथे एक विधी संघर्षीत बालक वय 16 वर्ष रा. बुरड मोहल्ला इतवारा बाजार वर्धा हा अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करतोय


यावरुन त्याचेवर प्रोव्हीशन रेड केला असता शाहरूख बेग रा. बुरड मोहल्ला इतवारा बाजार वर्धा हा याची भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये दोन फ्रिज मध्ये बार सारखा सेटअप लावुन विविध कंपनीच्या 31 प्रकाराच्या विदेशी दारूचा माल विक्री करतांना मिळुन आला त्याचे ताब्यातुन 1) दोन एल.जी कंपनीची फ्रिज अंदाजे की. 30,000/-रू 2) वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारू व बियर असा एकुन कि. 233,400/- रू एक जुना वापरता रियलमी कंपनीचा मोबाईल अंदाजे की. 10,000/- रू असा एकुन की. 273,400/- रू चा अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले. सदर विदेशी दारूचा माल हा कोणाचा आहे व कोणी आणुन दिला या बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की सदरचा विदेशी दारूचा माल हा शाहरूख बेग व जाहीद पठान दोन्ही रा. बुरड मोहल्ला इतवारा बाजार वर्धा यांचा मालकीचा असुन मी त्यांचे कडे 300/- रू रोज प्रमाणे कामाला नौकर आहे मी त्यांचा ग्राहक यांना विदेशी दारूचा माल नेवुन देत असतो तसेच सदर मिळुन आलेली विदेशी दारूचा माल हा मुकेश जयस्वाल रा. पुलगांव यांनी आणुन दिला आहे.

यावरुन सदर आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीविरूध्द 1) अपराध क्रमांक 1404/2024 कलम 65 ई. 77 अ, 83, म.दा.का. अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर करत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे याचे विशेष मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद के. मकेश्वर यांचे सुचनेप्रमाणे विशेष पथकातील पो.उप.नि. परवेज खॉन, पो.हवा. अमर लाखे, पोशि मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी केली


