एकतर्फी प्रेमातुन २३ वर्षीय युवतीची हत्या वर्धा दहेगाव गोसावी येथील घटना..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वर्धा : एकतर्फी प्रेम प्रकरणातून दहेगाव गोसावी येथे राहनारी अंकीता सतीश बाईलबोडे वय 23 वर्ष या युवतीची तिच्याच घराबाहेर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना
सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे सोमवार दिनांक २ /१०/२३ रात्री घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा
गावकाऱ्यामध्ये आहे. सदर युवती ही वर्धा येथे ब्युटीपार्लर चे प्रशिक्षण घेत होती त्यादरम्यान खालील नमुद आरोपींशी तोंडओळख होती

१)ज्ञानेश्वर खोब्रागडे वय २२, रा ईतवारा





२)अर्जुन ईटकर वय १७ रा महीला आश्रम



३) प्राप्ती जगताप वय २४ रा नालवाडी



४) आंचल पांडे रा गौरक्षण वार्ड

हे  दहेगाव गोसावी येथे आले होते. दोन मुलींनी मृत मुलीच्या घराच्या गेटजवळून बाहेर येण्यासाठी आवाज दिला. यानंतर युवती घराबाहेर आली.घराबाहेर अंगणात दबा धरून बसलेल्या दोन्ही युवकांनी पाठी मागून येऊन चाकूने युवतीच्या गळ्यावर सपासप वार केले. युवती जोरात ओरडल्यामुळे घरातील लोक बाहेर आले. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करून जुनोना या गावी पकडले.
गावकऱ्यांनी चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यानंतर
दहेगाव येथील पोलिस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले
आणि कडक कारवाईची मागणी केली.तात्काळ पोलिस अधिक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलिस अधिक्षक डॅा.सागर कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी ,वर्धा यांनी दहेगाव येथे भेट दिली  व आवश्यक त्या सुचना   पोलिस निरीक्षक योगेश कमाले यांना दिल्या त्याप्रमाणे  पुढील तपास दहेगाव पोलिस करीत आहेत





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!