
आंतराज्यीय चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनाक 27/06/23 रोजी पहाटे 3.30 वाजता दरम्यान हिंगणघाट मोहता चौक येथे असलेले पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000/- रू अनोळखी ईसमाने चोरून नेले होते त्यानुसार पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्रमांक 732/2023 भादवि कलम 380,457,34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता व त्या अनषंगाने वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे तपास सुरु होता त्यातच गुन्हे प्रकटीकरण पथक १ ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पथक प्रमुख पोलिस हवालदार सुमेध आगलावे व पथक यांनी बाहेर राज्यातील आरोपी
1) वेंकटेश गौडा रा.वन टाऊन विजयवाडा आंध्र प्रदेश


2) रमेश बाबु मुत्थुराज रा.कोविलपेट्टी तामिलनाडु

3) रंजीत रंजनकुमार तिलघरविधी,तिरुअंनतपुरम केरळ

यांना दिनांक 17/11/23 रोजी हिंगणघाट रेल्वे स्टेशन परीसरातुन चोरीच्या बेतात असतांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारणा केली असता सदर गुन्हा त्यांनी केल्याचे कबूल केल्याने त्यांचे ताब्यातून नगदी 103000/- रू व चोरी करण्यासाठी. उपयोगी असलेले साहित्य जप्त करून गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करण्यात आली वरील आरोपींनी चंद्रपुर,बल्लारशाह ,देसाईगंज ,आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी सुद्धा चोरीचे गुन्हे केल्याची पोलिसांना माहिती दिली आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नुरूल हसन ,अप्पर पोलिस अधिक्षक सागर कवडे सा.मा.उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मारोती मुळूक ठाणेदार हिंगणघाट याचे निर्देशा प्रमाणे पोलिस उपनिरीक्षक रमेश मिश्रा ,गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे ,पोहवा सुमेध आगलावे, प्रवीण बोधाने, अजहर खान,राहुल साठे पोलिस शिपाई आशिष नेवारे, अमोल तिजारे यांनी केली


