हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

 

 





हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे,दोन विधिसंघर्षीत बालकांसह एकास घेतले ताब्यात….



हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधिक्षक डॉ.सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात सर्व प्रभारी पोलिस निरीक्षक,सहा.पोलिस निरीक्षक यांना  जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.



त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक मनोज गभणे ठाणेदार पोलिस स्टेशन हिंगणघाट यांनी पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशीत करून त्यानुसार गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .त्यानुसार सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 20/02/24 रोजी फिर्यादी नामें गंगादर भेंडे यांनी पोलिस स्टेशन  हिंगणघाट येथे येऊन रिपोर्ट दिला कि ते दिनांक 19/02/24 रोजी निखाडे सभागृह येथे लग्न कार्यक्रम करिता गेले असता त्यांची मोटारसायकल MH31DL4036 PASSION PRO किमत 15000/-  ही निखाडे हॉल च्या बाहेर पार्किंग मध्ये उभी केली होती ती ते हॉल च्या बाहेर आल्यावर दिसली नाही फिर्यादी ची वरील वर्णनाची मोटारसायकल कुनीतरी  अज्ञात चोराने चोरून नेली अशा फिर्यादीच्या रिपोर्ट करून गुन्हा नोंद करून तपास सुरु असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की  संत तुकडोजी वॉर्ड येथे राहणारे 2 विधीसंघर्षित बालक व मोहता बगीचा मागे राहणारा अंकित विट्टल मदणकर याने चोरल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने नमूद आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे जवळून MH31DL4036 PASSION PRO किंमत 15000/-  तसेच 2 विधीसंघर्षित बालकाकडुन दुसऱ्या गुन्ह्यातील MH32 R5328 किंमत 20000/- ही वसंत सभागृह येथून चोरलेली मोटारसायकल  असा 35000/- च्या 2 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या व दोन गु्न्हे उघडकिस आणले

सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस   निरीक्षक मनोज गभणे यांचे सुचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पो हवा सुमेध आगलावे पोलिस अंमलदार अझर खान राहुल साठे अमोल तिजारे आशिष नेवारे यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!