वर्धा जिल्हा वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या ४ करोड दरोडा प्रकरणाचा ४ तासात उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की  श्री अट्ठेसिंग भगवानजी सोळंके, वय ४२ वर्षे, रा. चानसभा, जि. पाटण, राज्य गुजरात यांनी पोलिस स्टेशन वडनेर येथे तक्रार दिली की, फिर्यादी हे त्यांचे मालक कमलेश शहा, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे वाहनचालक काम करीत असून 3 महिन्यापुर्वी फिर्यादी यांना नागपूर येथील कार्यालयात चालक म्हणून काम करण्याकरिता पाठविले होते. फिर्यादी हे दिनांक 06.09.2023 रोजी श्री. शहा यांचे सांगणेवरून रू 4,52,00,000/- घेवून त्यांचा सहकारी अरविंद पटेल याच्यासह किया सेल्टोस या कारने नागपूर येथून हैद्राबाद येथे जात असता वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत शिवार रोडवर लाल दिवा लावलेली एक पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार सायरन वाजवत त्यांच्या कारचे बाजुला आली व त्यातील इसमांनी इशारा करून फिर्यादींना वाहन थांबविण्यास सांगितले. फिर्यादींच्या वाहनाला सदर इसमांनी त्यांची होंडा सिटी कार आडवी लावून त्यातील चार इसम खाली उतरले. त्यांनी फिर्यादी यांना वाहन परवाना दाखव असे म्हणून फिर्यादीचे वाहनाची चावी काढून घेतली. त्यानंतर सदर इसमांनी फिर्यादी व साक्षीदार अरविंद पटेल यांना मागच्या सिटवर बसवून चारही इसम फिर्यादीचे वाहनात बसून त्यांनी वाहन सुरु करून निघाले. सदर इसमांनी फिर्यादी व अरविंद यांचे मोबाईल हिसकावून घेवून बंद केले व फिर्यादी व अरविंद यांना हाथाबुक्क्यानी मारहाण करून रक्कम कुठे ठेवली आहे याबाबत विचारपुस केली. फिर्यादी यांनी मला माहित नाही असे म्हटले असता सदर इसमातील एका इसमाने रिव्हॉल्वर काढून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी भितीपोटी रक्कम दाखविली असता सदर आरोपी इसमांनी काही अंतर दूर जावून यातील फिर्यादी व अरविंद यांचे मोबाईल फोन फेकून देवून त्यांना गाडीचे खाली उतरवून दिले. फिर्यादीचे चारचाकी कार किया सेल्टोस किंमत 10,00,000/- रु. व नगदी 4,52,00,000/- रु. जबरीने हिसकावून चारही आरोपी पळून गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन वडनेर येथे अप.क्र. 416 /- कलम 397 भा.दं.वि. सहकलम 3.25 भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.पोलिस अधीक्षक  नूरुल हसन,  पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे व उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांनी सदरची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखा, पो.स्टे. वडनेर, पो.स्टे. हिंगणघाट, सी. आय. यु व सायबर शाखा येथील एकूण 100 अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग असेलेली एकूण 15 वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना सुचना देवून तपासकामी रवाना केले.पोलिस अधीक्षक नुरुल  हसन यांनी सदर गुन्हयाची माहिती  विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर छेरींग दोरजे यांना देवून त्यांच्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ येथील वरिष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करून मार्गदर्शन व मदत प्राप्त केली. सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान तांत्रिक माहिती, इतर वेगवेगळी माहिती व गोपनिय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरून आरोपी हे त्यांच्या होंडा सिटी कारसह नागपूरच्या दिशेने गेल्याचे समजल्याने अपर पोलिस अधीक्षक डॅा  सागर रतनकुमार कवडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचेसह तपास पथके रवाना करून नागपूर येथे तपास केंद्रीत करण्यात आला. पोलिस अधीक्षक यांचे नागपूर शहरातील असलेले गोपनिय बातमीदारांकडून गुन्हयाबाबत महत्वाची माहिती प्राप्त झाली. त्यावरून नागपूर गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने गुन्हयातील मुख्य आरोपी ब्रिजपालसिंग ठाकुर याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल व कसुन चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली तसेच त्याचेकडून इतर आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यावरून गुन्हयातील इतर आरोपी आदिल शेख, दिनेश वासनिक, ईशु स्वामी व रणजित वाघमारे यांना नागपूरातील वेगवेगळ्या ठिकांणांवरून ताब्यात घेण्यात आले. त्यांचे कडून गुन्हयातील जबरीने चोरी केलेल्या रक्कमेपैकी रोख रक्कम रू3,26,50,000/- व गुन्हयात वापरलेली होंडा सिटी कार एम.एच. 31 ई. क्यु. 0909 किंमत रू 10,00,000/- तसेच फिर्यादीची किया सेल्टोज कार किंमत 10,00,000/- असा एकूण जुमला किंमत रू 3,46,50,000/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.





नमुद आरोपीतांना मा. न्यायालयात पेश केले असता मा.न्यायालयाने आरोपीतांना दिनांक 13.09.2023 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली असुन त्यांचेकडून गुन्हयात वापरलेले हत्यार, दुचाकी वाहन तसेच उर्वरित रोख रक्कम जप्त करण्याबाबत तपास सुरू आहे. सदर गुन्हयाच्या एकूण तपासात पोलिस आयुक्त, नागपूर शहर अमितेश कुमार,विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर छेरींग  दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती जयंत  नाईकनवरे, पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामिण पोलिस उपआयुक्त गुन्हे शाखा व पोलिस उपआयुक्त परिमंडळ 2 नागपूर शहर यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.



सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल  हसन, यांचे मार्गदर्शन व निर्देशाप्रमाणे  अपर पोलिस अधीक्षक श्री. डॉ सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, हिंगणघाट रोशन पंडीत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक संदिप कापडे, संतोष दरेकर, दिपक वानखेडे, संदिप गाडे, संजय मिश्रा, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, तसेच पथक अंमलदार संतोष दरगुडे, हमीद शेख, गजानन लामसे, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, राजेश तिवस्कर, रोशन निंबाळकर, श्रिकांत खडसे, प्रदिप पिसे, गजानन दरणे, शिवकुमार परदेशी, अखिल इंगळे, मनिष कांबळे, राकेश आष्टनकर, प्रदिप वाघ, संघसेन कांबळे, विकास अवचट, राम इप्पर, नितीन इटकरे, गोपाल बावनकर, सागर भोसले, अभिजीत गावंडे, अरविंद इंगोले, मिथुन जिचकार, हर्षल सोनटक्के सर्व स्थागुशा, वर्धा व सायबर सेल वर्धा चे दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, विशाल मडावी, अंकीत जिभे, गोविंद मुंडे, अक्षय राउत यांनी केली.­







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!