महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठ्यांवर सावंगी मेघे पोलिसांचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सावंगी मेघे(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार दिपक वानखडे यांना गुप्त माहीती प्राप्त झाली की सालोड हिरापुर येथे प्रफुल हागे नामक ईसमाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखु गुटखा चे आपले घरात साठवणुक करुन त्याची थोक व चिल्लर विक्री करतो अशा गुप्त माहीती वरुन पोलिस पथकाच्या मदतीने  नमुद आरोपी याचे घरी सुगंधित तंबाकु गुटखा बाबत छापा घातला असता नमुद आरोपीचे घरझडती मधे

1) सुगधित तंबाकु बाबा 500 ग्रॅम वजनाचे 6 टिन वजन 3 किलो किं. 9510/- रु.





2) सुगंधित तंबाकु (हुक्का शिशा तबाकु मजा 108) 200 ग्रॅम वजनाचे 16 टिन वजन 3.2 किलो कि, 14960/- रु.



3) सुगंधित तंबाकु (रत्ना 3000) 50 ग्रॅम वजनाचे 10 टिन वजन 0.5 किलो किं. 1180/- रु.



4) सुगंधित तंबाकु (सागर शक्ति) 50 ग्रॅम वजनाचे 93 टिन वजन 4.65 किलो किं. 8370/- रु.

5) सुगंधित तंबाकु (जनम) 500 ग्रॅम वजनाचे 122 पॅकेट वजन 61 किलो कि, 30500/- रु.

6) पान मसाला ( विमल) 132 ग्रॅम वजनाचे 40 सिलबंद पॅकेट वजन 05.28 कि, 7920/- रु.

7)सुगंधित तंबाकु (व्हि मन) 30 ग्रॅम चे 40 पैकेट वजन 1.2 किलो कि. 880/- रु.

8) सुगंधित तबाकु (रेस) 500 ग्रॅम वजनाचे 70 पॅकेट 35 किलो कि. 19600/- रु.

9) सुगधित तंबाकु (555) 500 ग्रॅम वजनाचे 31 पॅकेट 15.5 किलो कि, 4650/-रु.

10) सुगधित तंबाकु (भाग्य) 50 ग्रॅम वजनाचे 1260 पॅकेट 63 किलो कि. 59220/- रु.

11) पान मसाला (पान पराग) 90 ग्रॅम चे 100 पॅकेट वजन 9 किलो कि, 12000/-रु.

12) पान मसाला ( राजश्री) 172.5 ग्रॅमचे 4 पॅकेट वजन 0.69 किलो कि. 1080/- रु.

13) पान मसाला (राज निवास) 90 ग्रॅम चे 41 पॅकेट बजन 3.69 किलो कि, 7872/- रु.
असा  वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाकु गुटखा एकुण जु.कि. 1,77,742/- रु. चा माल अवैधरित्या मिळुन आल्याने अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र वर्धा यांना सूचना देऊन केलेल्या कार्यवाही नंतर व शासनातर्फे लेखी तक्रारीवरुन पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे यातील आरोपी

प्रफुल आनंदराव हागे वय 25 वर्षे रा. वॉर्ड क्र. 6 सालोड हिरापूर ता. जि. वर्धा

यांचे विरोधात अप.क्र.628/23 कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम व नियमन 2011 चे कलम 26(1), 26(2) (iv). 27(3) (e), 30(2) (a) कलम 3(1) (zz) (iii) शिक्षापात्र कलम 59 नुसार तसेच सहकलम 188, 328, 272, 273 भा.द.वि.नुसार गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर कवडे,उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी मेघे दिपक वानखडे, पोलिस उपनिरीक्षक मगरे पोलिस हवा सतीश दरवरे,पो.ना. स्वप्निल मोरे,निलेश सडमाके,अनिल वैद्य,भूषण निघोट,पो.शी. निखिल फुटाणे यांचे कडून करण्यात आली .





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!