
हातभट्टीची दारु गाळणार्यावर सेलु (वर्धा)पोलिस स्टेशन दारुबंदी पथकाची कामगिरी..
सेलु(वर्धा) – दिनांक 23/09/2023 रोजी मौजा वघाळा शेत शिवारात धाम नदीच्या काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टॅाफ व मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर गजानन सुधाकर कडू वय-43 वर्ष, रा. वघाळा हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने सदर आरोपीचे ताब्यातून मौक्यावर 2 लोखंडी ड्रम मध्ये उकळता मोहा रसायन सडवा 100 लीटर, 4 लोखंडी ड्रम मध्ये 800 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा, 60 लीटर गावठी मोहा दारु व हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य असा एकूण जु.कि. 1,09,600/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी गजानन सुधाकर कडू वय-43 वर्ष, रा. वघाळा ता. सेलू, जि.वर्धा यांचे विरुध्द पोलिस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ. मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक . सागर कवडे, मा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू पोलिस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे यांनी केली.


