अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या तरुणाला वाशिम स्थागुशा पोलिसांनी केली अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या तरुणाला वाशिम स्थागुशा पोलिसांनी केली अटक

वाशिम – पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे, काळया बाजारात जाणारा गहु, तांदुळ विक्री करणाऱ्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी या दृष्टीने पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेऊन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत आदेशित केले होते.





दि.०१डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, पोस्टे. वाशिम ग्रामीण हद्दीतील नागठाणा येथील रहीवाशी आकाश बबन जाधव (वय २३ वर्ष) रा. नागठाणा याच्या राहत्या घरी तो दहशत माजविण्याच्या हेतूने तलवार बाळगुन आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन घराची झडती घेतली असता झडती मध्ये एक लोखंडी तलवार मिळुन आल्याने सदर इसमावर कायदेशीर कार्यवाही करून पोस्टे वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीविरूध्द भारतीय हत्यार कायदया अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.



सदर कारवाईत पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सपोनि जगदीश बांगर, पोहवा प्रशांत राजगुरू, पोना ज्ञानदेव म्हात्रे, महेश वानखेडे, पोकों अविनाश वाढे, निलेश इंगळे, मपोना संगिता शिंदे यांनी सहभाग नोंदविला असून नमुद गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा वाशिम हे करीत आहेत. तेव्हा आपणास या द्वारे आवाहन करण्यात येते की विनापरवाना शस्त्र बाळगणे कायदयाने गुन्हा असुन असे कृत्य करीत असतांना कोणी आढळुन आल्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा माहीती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!