गोमांस वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बोलेरा पिकअप वाहनातुन गोमांस वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले तिनं आरोपींना घेतले ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दिनांक  ३ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद,उमरखेड उपविभागात दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त पेट्रोलींग करीता असतांना पथकास खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक ०४/०२/२०२४ रोजीचे पहाटे ०२/०० ते ०३/०० वा. दरम्याण पुसद शेंबाळपिंप्री मार्गे एम.एच. ३७ टि २५९४ क्रमांकाचे बोलेरो पिकअप
वाहनातुन गोमांस वाहतुक होणार आहे. अशा खात्रीशीर खबरेवरुन         स्थागुशा पथकाने पंचासह रवाना होवुन पोलिस स्टेशन,खंडाळा
हद्दीतील हिवळणी पालमपट येथे सापळा लावुन थांबले असतांना माहिती प्रमाणे एम.एच. ३७ टि २५९४ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन पुसद कडुन येतांना दिसल्याने पो.स्टाफ चे मदतीने वाहन थांबवुन वाहनात असलेल्या इसमांना वाहनातील माला बाबत विचारपुस केली असता त्यांनी वाहनात अंदाजे १५ ते १६ गोवंशीय जनावराची कत्तल करुन गोमांस घेवुन जात असल्याचे सांगीतले त्यावरुन पंचासमक्ष वाहनाची तपासनी करुन वाहनातील इसमांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी





१) मोहम्मद कलीम अब्दुल गणी वय ३६ रा. दिवानपुरा मंगरुळपिर जि. वाशीम चालक,



२)मोहम्मद शहजाद मोहम्मद अकिल वय २१ वर्षे, रा. चेहलपुरा मंगरुळपिर जि. वाशीम



असे सांगुण सदरचे वाहन व माल हा

३) शेख इरशाद शेख वजिर वय ३८ वर्षे, रा. टेकडीपुरा मंगरुळपिर जि. वाशीम (पाहीजे आरोपी)

याचा असल्याचे सांगीतले वरुन नमुद दोन्ही आरोपी एक मोबाईल कि. ८०००रु, व वाहनातील २०१० किलो गोमांस कि.४,०२,००० रु
वाहन क्रमांक एम.एच. ३७ टि २५९४ बोलेरो पिकअप किंमत १०,००,०००/- रु असा एकुण १४,१०,००० रु चा मुद्देमाल जप्त
करुन आरोपीं  विरुध्द पोलिस स्टेशन खंडाळा येथे महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा अधिनीयमन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ.पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक यवतमाळ,  पियुष जगताप, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ, आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात, सपोनि गजानन गजभारे, चापोउपनि रेवन जागृत, पोलिस अंमलदार, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड,
सुनिल पंडागळे, ताज मोहमंद सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!