
अवैधरित्या गांजाची वाहतुक करणार्यावर सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा छापा….
सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाची अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतूक करणार्यावर धडक कार्यवाही,४,६७,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त.…
पुसद(यवतमाळ)जिल्हा प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,व्यसनाधीन होणारी आत्ताची युवापीढी व सहजतेने उपलब्ध होणारा अंमली पदार्थ याकडे गांभीर्याने बघता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी अशा युवापीढीला नशेच्या गर्तेत ओढणार्यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार दि 0१/०५/२०२५ रोजी सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुसद हर्षवर्धन यांचे पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिग्रस कडून काळी दौलत कडे दोन इसम एका मोटरसायकलवर गांजा विक्री करीता रात्री उशीरा येणार आहे


अशा गोपनीय माहितीची खात्री करुन प्रभारी अधिकारी पो स्टे पुसद ग्रामीण सपोनि राउत यांचेसह सहा पोलिस अधिक्षक यांचे
पथकातील पोहवा अभिजीत सांगळें, RCP पथक क.०९ पुसद येथील अंनलदार यांनी दिग्रस ते काळी दौलत रस्त्याने सापळा रचुन रात्रीचे दरम्यान वनोली गावाने फाटयाचे समोर छोटया पुलाजवळ दिग्रस कडुन एक मोटरसायकल काळीदौलत कडे येतांना दिसली त्यावरून मोटरसायकल चालकास थांबण्याचा इशारा केला असता, मोटर सायकल चालक हा मोटर सायकल थांबून अंधाराचा फायदा घेउन पळून गेला व मोटरसायकलचे मागील सिटवर बसून असलेला इसम हा मिळून आला. त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष गुलाब जाधव, वय ४० वर्षे, रा. चिचपात्र, ता. दिग्रस, जि. यवतमाळ,असे सांगितलेव त्याचे जवळील नायलॉन पोत्याची पाहणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित गांजा सहृष्य बनस्पती असल्याचे निदर्शनास आले,

तसेच त्यास पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव बळीराम वसराम राठोड, वय अ. ३७ वर्ष. सातघरी, ता. महागाव, जि. यवतमाळ असे संगितले. सदर गांजा सहष्य मुद्येमाल हा एकूण १७ किलो ३०० ग्रॅम प्रति किलो २५,०००/- रूपये प्रमाणे ४,३२,५००/- रू.चा व जुनी हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल क्र. MH 29 AA4229 ही ३०,०००/- रू.ची ओपो कपनीचा मोबाईल .चा अंसा एकुण ४.६७,९०- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त मुद्देमाल व आरोपी पो.स्टे. पुसद ग्रामीण यांचे ताब्यात देउन पो. स्टे. पुसद ग्रामीण येथे अप.क. २०२५ कलम C (क), २०(ब), NOPS Act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येउन आरोपी क्र १) संतोष गुलाब जाधव वय ५० व्, रा. चिचपात, ता. दिम्रस, जि. यवतमाळ यास सदर गुन्हयात, अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधिक्षक.पियुष जगताप,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधीकारी पुसद बी जे. हषवरधन यांचे मार्गदशंनानुसार प्रभारी अधिकारी पो.स्टे ग्रामीण,सपोनि राउत, ‘.पोउपनि राहुल देशमुख. पोहवा रविं गावंडे,चंदन जाधव,पोशि योगेश आळणे, तसेच RCP पथक क्र. ०९ पुस्द मधील पोहवा. अभिजीत सांगळे, गजानन चव्हाण,पोशि निरेश नरवाडे, पराग गिरनाळे,सौरभ लोखंडे, सुनिल
विरमाडे, इरफान अगवान, मुरली पांडुळे यानी केली अहे.



