
सहा पोलिस अधिक्षक हर्षवर्धन यांचे पथकाचा अवैधरित्या गुटखा व्यवसाईकावर छापा…
वसंतनगर मधील अवैद्य गुटखा व्यवसाईकावर सहाय्यक पोलिस अधिक्षक पुसद यांचे पथकाचा छापा,अवैधरित्या गुटख्याची साठवनुक करणारे यांचेसह गुटखा जप्त….
पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २४ एप्रिल २०२५ रोजी पोलिस स्टेशन- वसंतनगर, पुसद हद्दीमध्ये नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ, वसंतनगर येथे हकीमोद्दीन करीमोद्दीन यांचे घरी अवैद्य गुटख्याचा माल असल्याची गोपनीय माहिती सहा पोलिस अधिक्षक हर्षवर्धन यांना प्राप्त झाली. सदर माहितीची खात्री करण्याकरीता त्यांचे अधिनस्त असलेल्या विशेष पथकास नमुद घटनास्थळी छापा कारवाई करीता पाठविले


त्यानुसार सदर ठिकाणी आरोपी (१) हकीमोद्दीन करीमोद्दीन, वय ३६ वर्षे, आरोपी २) सैय्यद मुक्तार सैय्यद रशीद, वय २७ वर्षे, दोन्ही रा. नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ वसंतनगर, पुसद हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा अवैद्यरित्या बाळगतांना मिळून आले. सदर गुटख्याची किंमत. १,९१,४९६/- रू असलेला घटनास्थळी जप्त करण्यात आला व नमुद दोन्ही आरोपींना पोलिस स्टेशन वसंतनगर यांचे ताब्यात देण्यात आले

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक कुमार चिंता,अपर पोलिस अधिक्षक पियुष जगतार यांचे मार्गदर्शनानुसार सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी पुसद हर्षवर्धन यांचे अधिनस्त असलेले विशेष पथकातील पोहवा अभिजीत सांगळे, पोशि नरेश नरवाडे, पराग गिरनाळे, सौरभ लोखंडे, राहुल मडावी, सोनाली शेळके यांनी केली

अशाप्रकारे कुणीही इसम अवैद्यरित्या गुटखा विक्री, वाहतूक किंवा स्वतः चे घरी गोडावुन सदृष्य स्थितीत ठेवत असल्यास नागरीकांनी निर्भय होउन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, पुसद येथे माहिती कळवावी. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.


