
यवतमाळ पोलिसांची दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कार्यवाही…
पोलिस स्टेशन अवधुतवाडी हद्दीतील दोन धोकादायक गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत केले स्थानबद,एम.पी.डी.ए. अंतर्गत आजपावेतो एकुण २३ इसमांविरुध्द यवतमाळ जिल्हा पोलीसांकडुन स्थानबध्दतेची कारवाई….
यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील इसम


१) परवेज खान ऊर्फ बंटी लाला शम्मी खान वय ३२ रा. इंदीरा
नगर, यवतमाळ,

२) शहजाद खान शम्मी खान वय २७ रा. इंदीरा नगर, यवतमाळ

यांचा गुन्हेगारी अभिलेख सन २०१५ पासुन असल्याने व त्यांचे विरुध्द घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, घरात घुसून मारहाण करुन संपत्तीचे नुकसान करणे, चोरी, शिवीगाळ करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, जखमी करणे, गंभीर जखमी करणे, गैरकायदेशिर जमवून दंगा करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे पोलिस स्टेशन अवधुतवाडी व
यवतमाळ शहर येथे नोंद असल्यामुळे व त्यांनी यवतमाळ शहर व परिसरात दहशतीचे वातावरन निर्माण केले असल्यामुळे ठाणेदार पो.स्टे. अवधुतवाडी यांनी दोन्ही सराईत गुन्हेगारांचे एम.पी.डी.ए. अंतर्गत स्थानबध्द करणे बाबतचे प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक. यवतमाळ यांचे मार्फत मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केले होते.
सदर प्रस्तावास मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांनी मंजुरी देवुन आज दिनांक १५/१२/२०२३ रोजी स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले असल्याने त्यांना अकोला जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, ज्ञानोबा देवकते, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन अवधुतवाडी, सपोनि प्रताप भोस, पो.अंमलदार प्रतीक नेवार, पोस्टे अवधुतवाडी तसेच पोउपनि धनराज हाके, पोलिस अमंलदार बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघाट, सर्व स्थागुशा यवतमाळ, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


