कोंबड्यांची झुंज लावुन जुगार खेळणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पोलिस स्टेशन पाटण हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी जंगल परिसरातील कोंबड बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, २,२५,८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त….

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी येथे हजर असतांना गोपनीय  माहिती मिळाली की, पाटण पो.स्टे. हद्दीतील ग्राम कोडपा खिंडी गावाचे बाजुला असलेल्या जंगलामध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम हे कोंबडयाच्या पायाला लोखंडी काती बांधुन त्याची झुंज लावुन त्यावर पैशांची बाजी लावुन हारजीतचा खेळ खेळवित आहेत अशी  खबर मिळाल्याने पथकाने स्थानिक पोलिस स्टेशन मधील अंमलदार यांना सोबत घेवून प्राप्त माहिती प्रमाणे ग्राम कोडपा खिंडी बाजुला असलेल्या जंगल परीसरात जावुन छापा टाकला असता





१)गंगाधर अय्या आत्राम वय २५ वर्षे, रा. माडवा ता. झरी,



२) जिवन सुनिल मानकर वय २५ वर्षे, रा. कोडपा खिंड,



३)अनिल रामचंद्र पावडे वय ५६ वर्षे, रा. लहान पांढरकवडा,

४) भिमराव धर्माजी पेंदोर वय ४४ वर्षे, रा. टेंबी ता. झरी,

५) शंकर विठ्ठल आकुलवार वय ३० वर्षे, रा. माडवा ता. झरी,

६) शंकर सुर्यभान बोपाटे वय ४१ वर्षे, रा. मारकी ता. झरी,

७) लक्ष्मण रामा आत्राम वय ४० वर्षे, रा. माडवा ता. झरी,

हे त्याठिकाणी मिळुन आले नमुद इसमांचे झडतीमधुन नगदी १८७८/- , रुपये, ४ नग लोखंडी काती व ०४ कोंबडे (झुंज लढवण्याकरीता वापरात आणलेले) तसेच ०७ नग मोटार सायकल असा एकुण २,२५,८६०/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद आरोपीतांविरुध्द पोलिस स्टेशन पाटण येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, अपर पोलिस अधीक्षक, यवतमाळ, आधारसिंग सोनोने पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, स्था.गु.शा. यवतमाळ, सपोनि संदीप पाटील ठाणेदार पोस्टे पाटण, पोलिस अंमलदार योगेश डगवार, सुनिल
खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके सर्व स्था. गु.शा. यवतमाळ तसेच पोलिस शिपाई अमित पोयाम पो.स्टे. पाटण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!