खुनाचे प्रयत्नातील फरार आरोपीस गुन्हे शाखेने मुंबई येथुन घेतले ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

खुन व खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील दोन महीण्यापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई येथुन घेतले ताब्यात…

यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (१९)एप्रिल २४ रोजी पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील संकट मोचन उमरसरा परिसरात अनिल नारायण गवई यांचा धारधार शस्त्राने वार करुन खुन झाला होता व त्यांची पत्नी तसेच मुलीस सुध्दा आरोपीने धारधार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना झाली होती. सदर प्रकरणात फिर्यादी राजेंद्र नारायण गवई रा. गांधळी ता. बाभुळगांव ह.मु. गिलाणी नगर यवतमाळ यांनी पोलिस ठाणे अवधुतवाडी येथे दिनांक २०/०४/२०२४ रोजी दिलेल्या
तक्रारीवरुन आरोपी महेश भिमराव टेकाम वय ३० वर्ष रा. संकटमोचन उमरसरा यवतमाळ यांचे विरुध्द अपराध क्रमांक
५०३/२०२४ कलम ३०२, ३०७ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होत, घटनेपासुनच आरोपी महेश टेकाम हा फरार झाला
होता.
गुन्हयाचे गांभीर्य पाहुन गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी पोलिस ठाणे अवधुतवाडीसह स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यावरुनच स्थानिक गुन्हे शाखेतील पथके आरोपीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत होती परंतु आरोपी संबधाने कोणतीही माहिती मिळुन येत नव्हती त्यामुळे स्थागुशा कडील पथकाने आरोपीचे ठावठिकाणाची माहिती घेण्याकरीता गोपणीय बातमीदार नेमले होते.
त्यावरुन दिनांक ०२/०६/२०२४ रोजी पथकाला आरोपी महेश भिमराव टेकाम वय अं. ३० रा. संकटमोचन उमरसरा यवतमाळ हा
मुंबई येथे असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ वरिष्ठांची परवानगी घेवुन मुंबई करीता रवाना होवुन
आरोपी महेश भिमराव टेकाम वय  यास मुंबई येथुन दिनांक ०३/०६/२०२४ रोजी ताब्यात घेऊन असुन दिनांक ०४/०६/२०२४ रोजी पुढील कारवाई करीता पोलिस ठाणे अवधुतवाडी यांचे ताब्यात दिले आहे.





सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक, डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक, पियुष जगताप, आधारसिंग सोनोने, पोलिस निरीक्षक, स्थागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुगद पुंडगे, पोलिस अंमलदार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाउ, आकाश सहारे, चालक पोशी आकाश वानखेडे सर्व स्थागुशा
यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!