उस्मानाबाद पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने अवैधरित्या सुरु असलेल्या कत्तल खाण्यावर केली धडाकेबाज कार्यवाही

उस्मानाबाद- पोलिस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी चालु असलेला श्रावण महिना, आगामी काळातील गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या सणाच्या पार्श्वभुमीवर गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.05.09.2023 रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिस  अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलिस पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संतोष […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे केले जेरबंद

देसाईगंज(गडचिरोली)-  जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणा­यांवर  पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसारच दिनांक 04/09/2023 रोजी ट्रकमध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपनीय  बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर यांनी पोना/दिनेश राऊत व पोअं/नरेश कुमोटी, विलेश ढोके यांचेसह मौजा सावंगी ते गांधीनगर रोड दरम्यान ट्रक क्र. टी. एस. […]

Read More

गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा

गडचिरोली-  जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणा­र्यावर कठोर कार्यवाही चे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्यानुसार आज दिनांक 06/09/2023 रोजी पहाटे गडचिरोली शहरातील अवैध दारु वाहतूक संदर्भात कारवाई करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड […]

Read More

उस्मानाबाद ढोकी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

ढोकी(उस्मानाबाद )( प्रतिक भोसले) – पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 05.09.2023 रोजी ढोकी पोठा हद्दीत गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ढोकी तेवाकरवाडी रोडचे उजवे बाजूस स्मशान भुमिच्या बाजूला काही इसम तिरट मटका जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 19.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे […]

Read More

PMPL च्या बसमधे चोरी करणारी महीला लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

लोणीकंद(पुणे शहर)- पीएमपीएलच्या बसेस मध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या पर्स मधुन चोरी मोबाईल चोरी, पाकिटमारी असे प्रकार सुरु झाल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने नागरीकांच्या मुल्यवान वस्तूंचे संरक्षण व्हावे व या घटनांना प्रभावी पायबंद बसावा म्हणुन लोणीकंद तपास पथकाचे अंमलदार यांना सदर परीसरात पेट्रोलिंग व गोपनिय लक्ष ठेवणे कामी पाठवण्यात येत होते. दिनांक ०३/०९/२०२३ रोजी लोणीकंद पोस्टेचे पोशि पांडुरंग माने […]

Read More

सेलु पोलिसांची दारुबंदी विरोधात दबंग कार्यवाही

सेलु(वर्धा)-  दिनांक 05/09/2023 रोजी मौजा जामणी पारधी बेडा येथे काही ईसम व महीला हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असून तसेच गावठी मोहा दारुच्या हातभट्टी करिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत  आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी श्रीमती सोनु संजित भोसले […]

Read More

मोबाईल टॅावर बॅटरी व शेतीपंप चोरणार्या टोळीस रांजनगाव MIDC पोलिसांनी केले जेरबंद

रांजणगाव गणपती (पुणे ग्रामीन): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव-फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्यांच्या चोरी प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रीक रोहीत्र चोरीचे सत्र मागील काही महिन्यापासुन चालू होते. तसेच खंडाळे येथील शेतक-यांच्या शेतीपंप मोटारी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली […]

Read More

पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आणि ५० लाखांसाठी पुन्हा तुरुंगात गेला

पुणे : खुनाच्या गुन्ह्यात संचित रजा (पॅरोल) मिळवून बाहेर आलेल्या गुंडाने एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने गुंडाला पानशेत परिसरातून अटक केली आहे. रोहित शंकर पासलकर (वय २३, रा. रुळे-मोरदरी, ता. वेल्हे, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Read More

चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यातील १२ मोटारसायकल केल्या हस्तगत

चंद्रपुर- जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे […]

Read More

आईनेच पोटच्या पाच वर्षाच्या मुलीचा केला खुन

अकोला- पाच वर्षीय मुलीला आईनेच मारल्याची धक्कादायक घटना अकोला येथे घडलीये  मुलीची हत्या केल्यानंतर आईने तिच्या मृत्यूचा बनाव रचला होता. पण शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू नव्हे तर हत्या झाली असल्याचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोल्यातील बलोदे लेआउट इथं ही घडना घडली. किशोरी रवी आमले असं दुर्दैवी मुलीचं नाव असून विजया आमले असं तिच्या आईचं नाव […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!