
गुन्हे शाखा युनीट २ चा ॲपल ९ रेस्ट्रो बारवर छापा….
अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ चा AREA 91 बार व रेस्टो वर छापा, अल्पवयीन मुला मुलींना मद्य उपलब्ध करून देणा-या मालक व आयोजकावर कार्यवाहीचा बडगा…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील हॉटेल, धाबे पानटपरीवर लोकांना दारू पिण्यास जागा व साहीत्य उपलब्ध करून देणा-यांवर कार्यवाही करण्याबाबत सर्व प्रभारिंना तसेच गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा युनिट २ यांचे नेतृत्वात पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी शहराचे मध्यभागी असलेल्या रेस्टो बार वर धडाकेबाज कार्यवाही केली


याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १३/०७/२०२५ रोजी पो.नि संदिप चव्हाण, गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर यांना गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, शंकर नगर येथील हॉटेल “एरीया ९१” रेस्टो बार यामध्ये हॉटेल मालक व आयोजक यांनी फेक वेडींग या प्रोग्रॅामचे आयोजन करून त्याकरीता बार मध्ये काही अल्ववयीन मुला मुलींना प्रवेश देवून त्यांना बार मध्ये दारू व अंमली पदार्थ अवैध्यरित्या पिण्यास देत आहे.

अशा मिळालेल्या माहीती प्रमाणे शंकर नगर येथील हॉटेल ” एरीया ९१ ” रेस्टो बार येथे छापा टाकला असता ” एरीया ९१ “चे तिस-या मजल्यावर बारचे आतमध्ये १५० ते १७५ मुले व मूली डान्स करतांना असभ्य वर्तन करून शांतता व सार्वजनिक व्यवस्थेचा भंग करतांना दिसून आले. त्यामध्ये काही अल्पवयीन मुले व मुली हे दारूच्या सेवन करुन डान्स करतांना प्रथमदर्शनी निदर्शनास दिसून आल्याने सदर रेस्टो बार चे मालक आनंद राजु भेले वय ३३ वर्ष, रा. समर्थ हायस्कुलचे मागे, अमरावती यांना ताब्यात घेवून आयोजकाबाबत विचारले असता सॅम हेमंत बजाज, वय १९ वर्ष, रा. अनूप नगर, शिवशक्ती कॉलनी अमरावती व त्याचे इतर ४ साथीदार यांनी फेक वेडींग प्रोग्रॅम चे आयोजन केल्याचे समजले. बार मालक व आयोजक यांनी अल्पवयीन मुला मुलींना अवैध्यरित्या प्रवेश देवून त्यांना दारु पिण्यास मदत करुन त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बार मध्ये मुला मुलींनी दारू चे सेवन करून असभ्य वर्तन करून सार्वजनिक व्यवस्थेचा भंग केल्याने त्यापैकी अल्पवयीन ४० मुलांना वेगळे करून त्यांची अल्कहोलबाबत वैदयकिय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ अल्पवयीन मुले हे दारूच्या नशेत असल्याचा मा. वैदयकिय अधिकारी यांनी दिला.तसेच अल्पवयीन मुला मुलींना पुरविण्यात आलेले मद्याचे ५ बॉटल अपुर्ण भरलेल्या किं.अ. ३,७००/- रू च्या जप्त केल्या.

नमुद बार मालक व आयोजक यांनी बार परवाना अटी व शर्थीचे उल्लंघन करून अवैध्यरित्या अल्पवयीन मुला मुलींना प्रवेश देवून त्यांना मद्य (दारू) पिणेकरीता मद्याचा पुरवठा केल्याने त्यांचेविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा, (बाल न्याय) मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे होत असल्याने त्यांचे विरूध्द पो. स्टे. राजापेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त श्याम घुगे सहा पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात, सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोलीस अंमलदार – महेंद्र येवतीकर, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, योगेश पवार, राजीक रायलीवाले, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, चेतन कराळे, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शर्मा तसेच पो.स्टे. राजापेठ येथील महीला अंमलदार सुचित्रा यावले, पुजा चंदनपत्रे यांनी केली आहे.


