अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; तीन दुचाकी चोरासह जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती:

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अमरावती ग्रामीण पथकाने मोटर सायकलींची चोरी करणारे आरोपी आणि बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे.



१. मोटर सायकल चोराला अटक; ३ दुचाकी जप्त

  • अटक करण्यात आलेला आरोपी: संदीप गोवर्धन गोरडे (वय ३३ वर्षे, रा. अंजनवती, ता. धामणगाव रेल्वे).

  • कारवाईचा तपशील: ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने संदीप गोरडे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील हिरो होंडा मोटर सायकल (क्रमांक MH-27 S-5029) बाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.



  • तपासातील खुलासा: पोलिसांनी अभिलेखांवरून तपासणी केली असता सदर दुचाकी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंजनसिंगी येथून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस स्टेशन कुर्हा येथे अन्वये गुन्हा नोंद आहे.

  • इतर चोऱ्यांची कबुली: आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने अंजनसिंगी, पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे  आणि पोलीस स्टेशन बेनोडायेथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.



  • जप्त मुद्देमाल: आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या एकूण ०३ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

२. ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत जुगार अड्ड्यांवर छापे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन ठिकाणी छापे टाकून जुगार खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली:



  • पष्ठोट हद्द (५२ ताश पत्ते जुगार):

    पोलीस स्टेशन पष्ठोटच्या हद्दीत छापा टाकून २५०० रुपये रोख, ०२ मोबाईल फोन आणि ०३ मोटर सायकली असा एकूण २,२३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • पिंपळखुटा मोठा (वरली मटका जुगार):

    पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीतील पिंपळखुटा मोठा येथे वरली मटका जुगारावर छापा टाकून २९५० रुपये रोखसह १२,१५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

(आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ‘महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ (अ)’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.)

कारवाई करणारे पोलीस पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सतीश झालटे, पोउपनि आकाश शिवणकर, तसेच पोलीस अंमलदार गजेंद्र ठाकरे, सुधीर बावने, चेतन दुबे, सचिन गायधने, मंगेश लकडे, सचिन मसांगे, हर्शल काळे, शाम सोनोने, विवेक घोरमाडे आणि रुपेश गावंडे यांच्या पथकाने पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!