
अट्टल घरफोड्या गजानन लोणारे अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..
अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे फिर्यादी
मोहम्मद ईशाक मोहम्मद युनूस, वय 50 वर्ष, रा. बालासुंदरी मंदिराजवळ, शेंदुरजना घाट, ता. वरूड जि. अमरावती


यांनी दिनांक 19/10/2023 रोजी तक्रार दीली की, कोणीतरी अज्ञाताने दि. 18/10/2023 चे रात्री पासून ते दि. 19/10/2023 चे सकाळ दरम्यान त्याच्या घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन
घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण 1,57,500/- रू. चा मुद्देमाल चोरी केला आहे. अशा फिर्यादिच्या तक्रारी वरून पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे
गुन्हा रजि. क. 394/ 23 कलम 457.380 भादवीचा गुन्हा दाखल करूण तपासात घेण्यात आला होता त्याअनुषंगाने दिनांक 20/10/2023 रोजी गोपनिय माहीती मिळाली की,

महेश लोनारे, नामक इसम हा सोन्या चांदीचे दागीने घेवुन विक्री करीता वरूड ते धनोडी रोडवरील साईकृपा हॉटेल जवळ विचारपुस करीत आहे अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरुड ते धनोडी रोडवरील साईकृपा हॉटेल जवळ जाऊन गोपनीय खबरे प्रमाणे संशईत इसम हा त्याचे शाईन मोटार सायकलवर

महेश गजानन लोनारे वय 27 वर्ष रा जामगाव ता नरखेड जि नागपुर यास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता तो उडवाउडविचे उत्तरे देवु लागला त्यास विश्वासात घेवुन अधीक विचारपुस केली असता त्याने दिनांक 17/10/2023 ते दिनांक 18/10/2023 रोजी
दरम्यान शेंदुरजना घाट येथील एका घरात आणि बालासुंदरी देविच्या मंदिरात चोरी केल्याची कबुली दिल्यावरूण त्याचे ताब्यातुन सोन्याचे दागीने 14,460 ग्राम
चांदीचे दागीने 130 ग्राम
जुना वापरता poco कंपनिचा 01 अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन
आणि आरोपीच्या
ताब्यातील 01 होंडा शाईन कंपनिची मोटार सायकल कमांक एम.पी. 48 एन.ए. 5879 व
नगदी रोख रक्कम असा एकूण 1,40,920 /- रू. व चा मुद्देमाल जप्त करूण ताब्यात घेतला आहे.
नमुद आरोपीचे संदर्भाने अमरावती ग्रामीन पोलिस अभिलेखाची पाहनी केली असता नमुद आरोपीने अमरावती ग्रामिण घटकातील 1) पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट गुन्हा रजि. क. 394 / 2023
कलम 457, 380 भादवि,
2) पोलिस स्टेशन वरूड गुन्हा रजि. क. 456/2023 कलम 457, 380 भादवि,
3) पोलिस स्टेशन वरूड गुन्हा रजि क. 503/2023 कलम 379 भादवि,
4) पोलिस स्टेशन वरूड गुन्हा रजि. क. 591/2023 कलम 457, 380 भादवि चे गुन्हे उघडकीस येत आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशीकांत सातव याचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेत्तृवात पोउपनि नितीन
चुलपार, शेख तस्लीम मुलचंद भांबुरकर सपोउपनि संतोष मुंदाने, पोहेकॉ बळवंत दाभणे, रविद्र बावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पोकॉ पंकज फाटे, चालक पोना
हर्षद घुसे, मंगेश मानमोठे यांनी केली. असुन पुढील तपास पोलिस स्टेशन शेदुरजना घाट करीत आहे.


