मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा…
मु्र्तिजापुर(अकोला)- दि. ३१ / १० / २०२३ रोजी पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांचे तोंडी आदेश व माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा पथकाने पो.स्टे. मुर्तिजापुर शहर हद्दीत ग्राम सोनाळा रोड वरील शेती मालासाठी असणा-या गोडावुन च्या मागे जुगार रेड केला असता
१) किशोर देविदास चतुरकर, वय ४० वर्ष, रा. संताजी नगर, मुर्तिजापुर जि. अकोला
२) विजय भारत येदवर, वय ३२ वर्ष, रा. लहरिया प्लॉट, स्टेशन विभाग,मुर्तिजापुर जि. अकोला
३) जयेश विनोद कोठारी, वय ३२ वर्ष, रा. जुनी वस्ती मोरारजी चौक, मुर्तिजापुर जि.अकोला
यांना जागीच पकडले व ईतर इसम पोलिसांना पाहुन अंधराचा फायदा घेवुन फरार झाले. वरून तीन नमुद आरोपी जवळुन व घटनास्थळावरून असे एकुण ५२ तास पत्ते, नगदी १११००/रू, व ०३ मोबाईल कि. ४२०००/रू व १० मो.सा. ५०००००/ रू चे असा एकुण ५,५३,१००/ रू चा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करून पो.स्टे. मुर्तिजापुर शहर यांचे ताब्यात देण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, व पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, अन्सार अहमद, स्वप्नील चौधरी, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतिश पवार व
चालक प्रशांत कमलाकर, प्रकाश लोखंडे यांनी केली आहे.