अमरावती मध्ये विनापरवाना रेड्यांची झुंज लावणाऱ्यांना पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती मध्ये विनापरवाना रेड्यांची झुंज लावणाऱ्यांना पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

अमरावती – विनापरवाना हेल्याचे (रेड्यांचे) प्रदर्शन व झुंज भरवुन लोकांना एकत्र करून पोलीस आयुक्त सो यांच्या मपोका कायद्याच्या आदेशाचे उल्लंघन करून हेल्याची टक्कर आयोजीत केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, दि.३ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, फ्रेजरपुरा पोस्टे यांना मिळालेल्या माहीतीवरून दुपारी १५/१५ वाजेच्या सुमारास आरोपी लवकुश नायकवाड, महेश शेरवाने, हीरालाल शेरवाने, राज नागीन, राजाभाई पत्रकार यांनी विनापरवाना ठाकुर ढाब्याचे मागील बाजुस हेल्याचे प्रदर्शन व झुंज भरवुन लोकांना एकत्र करून पोलीस आयुक्त सो यांचे मपोका कायदा ३७ (१) (३) चे आदेशाचे उल्लघन करून हेल्याची टक्कर आयोजीत करून इसम नामे १) जतिन गुरूसिंग ठाकुर (वय ३५ वर्षे) रा.परीहारपुरा, वडाळी अमरावती २) तमीज खॉ अस्लम खॉ वय (२७ वर्षे), रा.गटरमलपुरा, परतवाडा जि.अमरावती ३) अब्दुल फयास अब्दुल नसीर (वय ४२ वर्षे), रा. नुर नगर, नागपुरी गेट, धर्मकाटा जवळ अमरावती ४) शेख अमीर शेख रशीद (वय ३५ वर्षे), रा. रहाटगाव मजीद जवळ, अमरावती ५) नवल परसराम नंदवंशी (वय २६ वर्षे), रा. रवीनगर परतवाडा जि.अमरावती ६) अब्दुल वसीम अब्दुल मोसीन (वय ३२ वर्षे), रा. ताजनगर अमरावती ७) अंतोष मोतीरामजी राठोड (वय ३० वर्षे), रा. ग्राम परसोडा, ता. जि.अमरावती ८) सागर प्रमोद मोहोड (वय ३२ वर्षे), रा. पुर्णानगर, ता. चांदुरबाजार जि.अमरावती ९) नसीम बेग बब्बु बेग, (वय ३६ वर्षे), व्यवसाय दुधाचा व्यापार, रा. धोतरखेडा ता. अचलपुर जि. अमरावती यांचे ताब्यातील हेल्याची झुंज लावुन त्यावर पैशाने हारजित घेऊन जुगार खेळला व खेळविला व हेल्यांची टक्कर लावुन त्यांना क्रूरपणे वागणुक दिली म्हणुन त्यांचेवर हेल्याची झुंज लावुन त्यावर पैशाने हारजित घेउन जुगार खेळला व खेळविला व हेल्यांची टक्कर लावुन त्यांना कुरपणे वागणुक दिली म्हणुन त्यांचेविरुदध प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० कलम ११, जुगार कायदा कलम १२ अ, मपोका कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन एकुण ५,७०,००० रु चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा परिमंडळ १ सागर पाटील सो, सहा पोलिस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग, कैलास पुंडकर,यांचे मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सहा. पोलिस निरीक्षक, विरेंद्र केदारे, सहा. पोलिस निरीक्षक रविंद्र सहारे, पोहवा  योगेश श्रीवास, नापोका शशिकांत गवई, हरीश बुंधेले,  हरीश चौधरी, पोशि  सतिष पराळे, जयेश परीवाले,  मुसाईद खान, सचिन मेश्राम,  रूपेश खंडारे,  सचिन वरठे, पोहेका  सुरेंद्र पवार, पोशि सुरेंद्र भोगे, पोशि  निलेश बिजवे, पोशि  गिरीश सरोदे, पोशि  सुनिल गिरपुंजे, वाहनचालक नापोका अमोल राठोड, यांनी केलेली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!