
विनापरवाणा दारुची वाहतुक करणारा सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकांचे ताब्यात…
सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या पॅगो टेम्पोसह एकुण २,४६,६६०/- रुपयाचा माल जप्त करत केली कारवाई…
लोणावळा – लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना पुणे ते आपटी दरम्यान टेम्पो मधे अवैधरित्या दारुची वाहतुक होणार असल्याची गुप्त खबर मिळाली
त्यांनी त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचेसह मौजे आपटी गावचे हद्दीमध्ये पुणे ते आपटी रोडवर दबा धरुन बसून पॅगो कंपनीचा टेम्पो नं. MH12TU1473 व त्यामधील कि. रु.९६,६६०/- रुपयांची दारु असा एकूण २,४६,६६०/- रुपयाचा माल काल दि. ०६/१२/२०२३ रोजी पकडून त्यावरील चालकाविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयांतर्गत गुन्हा दाखल करीत करवाई केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक पुणे मितेश घट्टे ,सत्यसाई कार्तिक सहा. पोलिस अधीक्षक, लोणावळा विभाग, लोणावळा यांचे मार्गदर्शनाखाली वाचक सहा. पोलिस निरीक्षक सचिन राऊळ, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पो. हवा. सिताराम बोकड, नापोशि किशोर पवार, पो.शि सुभाष शिंदे यांनी केली आहे.




