
नागपुर शहर परीमंडळ ५ पोलिस उपायुक्ताच्या पथकाची जुगार अड्डयावर धाड…
पोलिस उपायुक्त, परि क्र. ५, यांचे विशेष पथकाची कामगिरी जुगार खेळणाऱ्या आरोपींचे ताब्यातुन एकुण १०,५७,१८५/- रू चा मुद्देमाल जप्त…..
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०५.०१.२०२४ चे ०९.३० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती मिळाली की संजय हिरामन येंडे याचे राहते घरी, गुरांचे गोठयात, गाव आवंडी, नविन कामठी येथे ५२ तासपत्ती जुगार सुरु आहे अशा माहीतीवरुन सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता,


आरोपी क्र. १) संजय हिरामन येंडे, वय ५३ वर्ष

हा त्याचे घरी अवैधरित्या जुगार अंड्डा चालवितांना त्याचे साथीदार

आरोपी क्र. २) प्रशांत तुकाराम वाघ वय ३४ वर्ष रा. शिवाजी चौक, कडोली
३) रूपेश मालाराम गेचोडे वय ३६ वर्ष रा. आवंडी, कामठी
४) वेदांत अनिल मानवटकर वय १९ वर्ष रा. बोरगाव
५) ओम विलास क्षिरसागर वय १८ वर्ष रा. जाकेगाव, मौदा
६) प्रथमेश प्रविण येंडे वय २३ वर्ष रा. आवंडी
७) जितेन्द्र गंगाधर येणेकर वय ४२ वर्ष
८) प्रविण देवचंद मेश्राम वय ३२ वर्ष रा. गुमथळा
९) रामेश्वर नारायण ढोके वय ३० वर्ष रा. कडोली
१०) राहुल भगवान सहारे वय २७ वर्ष रा. दिघोरी, मौदा
११) अंकुश गौतम मानवटकर वय २४ वर्ष रा. जाकेगाव, मौदा
१२) अमोल भारत मानवटकर वय २२ वर्ष रा. जाकेगाव, मौदा
१३) प्रमोद कुंजीलाल बोरकर वय ५५ वर्ष रा. आवंडी
१४) हाफीज अब्दुल शेख वय ३६ वर्ष रा. गुमथळा, कामठी
१५) सोनल दामोदर चंदनखेडे वय ३३ वर्ष रा. आवंडी
१६) सोमेश्वर दामोदर नखाते वय ३२ वर्ष रा. गुमथळा, कामठी
१७) लक्ष्मण लहुजी कडु वय ४० वर्ष रा. कडोली
१८) आकाश रविंद्र सांगोळे वय २३ वर्ष रा. गुमथळा
१९) प्रमोद यादवराव ठाकरे वय ४५ वर्ष रा. दिघोरी, कामठी
२०) मन्ना मारोतराव ठाकरे वय २९ वर्ष
२१) नितीन शेषराव भोयर वय २४ वर्ष दोन्ही रा. गुमथळा, कामठी यांचे सह जुगार खेळतांना मिळुन आले. आरोपी क्र १ याने बेकायदेशीर विना परवाना दारूचा साठा बाळगुण खाद्य पदार्थ
व साहित्य उपलब्ध करून दिले. आरोपींचे ताब्यातुन रोख रक्कम १,०७,५०५ /- रू दरी, ताश पत्ते, १८ मोबाईल फोन, ९ मोटरसायकल, रॉयल स्टॅग दारू ५ बॉटल, देशी दारूच्या १६० बॉटल, फ्रीज, म्युजिक सिस्टम, कुलर, सोफा व ईतर साहित्य असा एकुण अंदाजे १०,५७,१८५/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.यावरुन पोलिस ठाणे नविन कामठी येथे आरोपींविरूध्द कलम ६५ (ई), ६८, ८४ म.दा.का, सहकलम ४, ५ म.जु का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलिस आयुक अश्वती दोरजे मॅडम, निकेतन कदम पोलिस उपायुक्त परि क्र. ५, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि प्रमोद पोरे, सपोनि जितेन्द्र
ठाकुर, पोउपनि दिपक पवार, पोहवा रवि शाहु, विशाल मेश्राम, नरेश खरगबान, पोअ अंकुश गजभिये, योगेश तातोड,पवन सिरसाट, श्याम फोकमारे, राहुल वाघमारे, नसिम अंसारी, विशाल पवनीकर यांनी संयुक्तरित्या केली.


